हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील लोकप्रिय कॉमिक शो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सगळ्यांचाच लाडका गौऱ्या अर्थात गौरव मोरे चांगलाच प्रकाश झोतात आला आहे. गौरवने गेल्या काही काळात आपल्या कमालीच्या टायमिंगने आणि मिश्किल अंदाजाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचे बरेच स्किट प्रेक्षक आवडीने पुन्हा पून्हा पाहताना दिसतात. गौरव सोशल मीडियावर सक्रिय असतो आणि आज त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त एक खास कृतज्ञता व्यक्त करणारी पोस्ट शेअर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेता गौरव मोरे याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना त्याने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्या शेजारी उभं राहून काढलेला फोटो पोस्ट केला आहे. यासोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘We are because,he was”Thank you Babasaheb’. तर गौरवने लिहिलेल्या कॅप्शनचा अर्थ असा कि, ‘तुम्ही होतात म्हणून आम्ही आहोत.. तुमचे खूप खूप आभार’. गौरवच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स करत बाबासाहेबांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
या पोस्टवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचं शास्त्र प्रदान करण्याचं कसब.. इतिहासात खूप कमी लोकांना जमलं.. अशा अलंकृत इतिहासाचे बिनीचे शिलेदार म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. प्रज्ञावंतांच्या या महानायकास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..’ अशा अनेक विविध कमेंट्स आपल्याला या पोस्टवर पहायला मिळत आहेत. अभिनेता गौरव मोरेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून त्याने अभिनयविश्वात पदार्पण केलं. मात्र ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाने त्याला विशेष ओळख दिली. मराठी मालिका, चित्रपटांसोबत त्याने काही हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
Discussion about this post