हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानतील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची आणि तिथल्या भयाण वास्तवाचे दर्शन घडवणारा ‘बलोच’ हा मराठी ऐतिहासिक चित्रपट येत्या ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले आहे. तर विश्वगुंज पिक्चर्स आणि कीर्ती वराडकर प्रस्तुत ‘बलोच’मध्ये प्रवीण विठ्ठल तरडे आणि अशोक समर्थ हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटासाठी मनसे नेते अमेय खोपकर यांनी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
मनसे नेते अमेय खोपकर यांनी ‘लय भारी’, ‘येरे येरे पैसा’ अशा, ‘जागो मोहन प्यारे’, ‘दे धक्का’ अशा अनेक जबरदस्त चित्रपटांची निर्मिती केली आहे. यानंतर आता आगामी ‘बलोच’ या मराठी चित्रपटाची ते प्रस्तुती करत आहेत. तर आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर त्यांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘लाख भक्त एक रक्त, सज्ज सक्त कडकडे, आरंभी युद्धाच्या, विजयाचे चौघडे… सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा, ‘बलोच’ ५ मेपासून चित्रपटगृहांत!’ त्यांनी शेअर केलेल्या या करताच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा प्रेक्षकांना ‘बलोच’मध्ये पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांची असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, दत्ता काळे (डी के), जितेश मोरे, संतोष बळी भोंगळे, नेमाराम चौधरी, बबलू झेंडे, गणेश खरपुडे, ज्ञानेश गायकवाड चित्रपटाचे निर्माते आहेत. तर पल्लवी विठ्ठल बंडगर, सुधीर वाघोले, विजय अल्दार सहनिर्माते आहेत.
Discussion about this post