हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवर अत्याधिक पाहिली जाणारी मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेचा टीआरपी इतर मालिकांपेक्षा नेहमीच अधिक राहिला आहे. याच कारण म्हणजे मालिकेचे कथानक, कलाकारांचा अभिनय आणि कथानकातील मनोरंजनात्मक वळणे. अलीकडेच मालिकेतील आई अर्थात अरुंधतीचं दुसरं लग्न झालं आणि ती तिच्या नव्या संसारात रमू लागली आहे. यानंतर आता अरुंधतीची लेक ईशा प्रेमात पडली आहे आणि यामुळे तिच्या लग्नाबाबत देशमुखांच्या घरात चर्चा सुरु आहे.
अलीकडच्या भागात अनिशच्या प्रेमात पडलेली ईशा घरातून पळून गेली होती. मात्र इतक्यात अरुंधतीने तिला पुन्हा घरी आणले. दरम्यान ईशा लग्नाबाबत ठाम असल्याचे सांगते. त्यामुळे अरुंधती तिला पाठिंबा देत ईशा- अनिशच्या साखरपुड्याचा प्रस्ताव मांडते. यासाठी अनिरुद्ध विरोध करताना दिसला. पुढे ईशा अरुंधतीची माफी मागताना दिसली आणि आपल्यामुळे इतर कुणालाही त्रास होणार नाही असे वचन देते. दुसरीकडे अनिशसोबत बोलताना अरुंधती त्याला ‘माझ्या लेकीचा सांभाळ करशील ना..?’ असे विचारते. एकंदरच मालिकेत पुन्हा मंगलमय सूर घुमणार आहेत.
मालिकेच्या वळणाने प्रेक्षक मात्र नाराज झाले आहेत. अलीकडेचं अरुंधती आणि आशुतोषचं लग्न झालं. त्यात आता लगेच ईशा – अनिशच्या लग्नाची बोलणी..? यामुळे प्रेक्षकांनी मालिकेतील कथानकावर टीका केली आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘तुम्ही या मालिकेत फक्त लग्न, साखरपुडा आणि लफ़डीच दाखवू शकता.. कारण आम्ही फक्त तेव्हढंच पाहतोय’, तर आणखी एकाने म्हटले, ‘कधीकाळी मी या मालिकेचा चाहता होतो पण आता हि मालिका माझ्या डोक्यात जाऊ लागली आहे’.
यानंतर नव्या एपिसोडमध्ये ईशा परीक्षेला जाऊन ब्लॅक झाल्याने पेपर देऊ शकलेली नाही. यामुळे अनिरुद्ध संतापला आहे आणि तो ईशाला कॅनडाला पाठवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे आशुतोषची बहीण वीणा परत येणार असल्याने त्याची आई आनंदी झाली आहे.
Discussion about this post