Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

शाळेत असताना किती वेगळे असतो ना आपण…; पहिल्या प्रेमाची आठवण करून देणार ‘गेट टुगेदर’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
139
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शालेय किंवा कॉलेज जीवनात एखाद्या मुलावर किंवा मुलीवर प्रेम असतं. पण काही ना काही कारणानं ते प्रेम यशस्वी होत नाही. या पहिल्या प्रेमाची पुन्हा आठवण करून देण्याचा प्रयत्न “गेट टुगेदर” या चित्रपटात करण्यात आला आहे. या चित्रपटाचा नॉस्टेल्जिक करणारा टीजर नुकताच लाँच करण्यात असून, उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. येत्या १९ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात हा चित्रपट प्रदर्शीत होणार आहे.

सतनाम फिल्म्स प्रस्तुत गेट टुगेदर या चित्रपटाची निर्मिती समीर गोंजारी, संजय गोंजारी, आशिष धोत्रे यांनी केली आहे. चित्रपटाची पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन सचिन धोत्रे, तर कथा आणि संवाद लेखन प्रवीण कुचेकर यांचे आहे. अजय रणपिसे यांनी चित्रपटाला संगीत दिलं असून सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन, जावेद अली गायिका आर्या आंबेकर, प्रियांका बर्वे यांनी चित्रपटातली सुमधुर गाणी गायली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Director Sachin Suresh Dhotre (@satnam_filmsproduction)

“देवमाणूस” या गाजलेल्या मालिकेतील एकनाथ गिते, अॅटमगिरी, वाघेऱ्या अशा चित्रपटात काम केलेली श्रेया पासलकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई या मालिकेतील त्रिशा कमलाकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. पावसाळी वातावरणात एकांतात असलेलं जोडपं टीजरमध्ये दिसतं आणि पहिल्या प्रेमाची आठवण करून देणाऱ्या संवाद ऐकू येतो. चित्रपटाचा टीजर रोमँटिक असल्यानं या चित्रपटाविषयी आता उत्सुकता वाढली आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: Instagram PostOfficial TeaserUpcoming Marathi MovieViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group