हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचं ट्रेंडिंग कपल अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जून कपूर नेहमीच चर्चेत असतात. त्यांचं प्रेमप्रकरण हे जूनं झालं असलं तरीही चांगलंच चर्चेत राहताना दिसतं. असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी त्यांची चर्चा होत नाही. गेल्या काही काळापासून अर्जुन आणि मलायका लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत दोघांनीही इतक्या लवकर नाही आम्ही आमचं नातं एन्जॉय करत असल्याचं म्हटलं असलं तरी सोशल मीडियावर रोज काही ना काही गॉसिप सुरूच असत. नुकताच सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यावरून हे कपल पुन्हा ट्रोलिंगचे शिकार झाले आहेत.
तसं तर अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा दोघेही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे कपल आहे. त्यामुळे सोशल मीडियावर हे कपल नेहमीच विविध पोजमधील फोटो शेअर करत असतात. अनेकदा यांचे रोमँटिक व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होतात. तसंतर सोशल मीडियावर वारंवार त्यांच्यात असलेल्या वयाच्या अंतरामुळे हे कपल ट्रोल होताना दिसतं. इतजकंच काय तर त्यांचे विविध पोज मधील फोटो तसेच रोमँटिक व्हिडिओदेखील व्हायरल होताना दिसतात. याही वेळी सोशल मीडियावर त्यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. जो पाहून ट्रोलर्स तुटून पडले आहेत. या फोटोत अर्जुन- मलायका एका लिफ्टमध्ये दिसत आहेत. यावेळी दोघांनीही पोज दिली आहे आणि मलायकाने हा फोटो आरश्यात क्लिक केला आहे.
हा फोटो शेअर करत सोबत अर्जुनने ‘थोडीसी तोह लिफ्ट करा दे’ असे कॅप्शन लिहिले आहे. या फोटोवर त्यांचे चाहते पसंती दर्शवत आहेत. तर ट्रोलर्स त्यांचं काम उत्तम करत आहेत. एका नेटकऱ्याने यावर कमेंट करत म्हटले आहे कि, ‘थोडीशी काय..? अजून किती लिफ्ट करणार भावा’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘आता लिफ्ट नाही.. आता आयफोन घेऊन दे’. तर आणखी एकाने म्हटले आहे, ‘तुला तर लिफ्ट पण लिफ्ट करू शकत नाही’. अन्य एकाने लिहिले, ‘आता ती लिफ्ट तरी सोडा रे.. हि काय जागा आहे का’. तसेच आणखी काही नेटकऱ्यांनी ‘आता खुल्लम खुलला रोमांस बंद करा आणि लग्न करा असे म्हटले आहे’.
Discussion about this post