हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर हि तिच्या उत्तम अभिनय अन दर्जेदार नृत्य शैलीमुळे नेहमीच चर्चेत असते. विविध चित्रपटांच्या माध्यमातून अमृता खानविलकरने स्वतःची एक ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे आज अमृता आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत असणारं बहुचर्चित नाव आहे. अमृता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि त्यामुळे नेहमीच विविध फोटो, व्हिडिओच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. त्यासोबत लिहिलेलं कॅप्शन लक्ष वेधून घेत आहे.
तशी तर अमृता नेहमीच तिच्या विविध भूमिकांमुळे प्रसिद्धी झोतात दिसते. पण अनेकदा तिचा ग्लॅमरस अंदाजदेखील तिच्या लोकप्रियतेचं कारण ठरताना दिसतो. सध्या अमृताने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमुळे आणि त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे लक्ष वेधून घेतलं आहे. या फोटोत अमृता मंचावर हात जोडून उभी आहे. या फोटोला कॅप्शन देताना अमृताने लिहिलं आहे कि, ‘कधी कधी काही लोकांना लांबूनच हात जोडणंच चांगलं असतं’. अमृताच्या कॅप्शनची कमाल चर्चा रंगली आहे.
आता अमृताने या फोटोसोबत असं कॅप्शन का दिलं..? कुणासाठी दिलं..? अगदी सहज कि कुणावर नेम साधून..? हे काही सांगता येणार नाही. पण ज्याच्यासाठी असेल त्याला जरूर कळेल असे म्हणता येईल. या पोस्टवर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कमेंट्स केल्या आहेत. या पोस्टवर कमेंट करताना अभिनेत्री श्रेया बुगडेने म्हटलंय, ‘अगदी बरोबर’. तर अभिनेता प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओकने ‘शूssss’ अशी कमेंट केली आहे. तर सायली मराठेने ‘बरोबर’, अशी कमेंट केली आहे. तसेच आरती सिंगने देखील कमेंट करत लिहिलंय, ‘शपथ यार… नमस्ते भाऊ’.
Discussion about this post