हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे चर्चेत राहिली आहे. कधी अंतर्वस्त्र, कशी स्त्रियांविषयीचा मुद्दा, तर कधी खाजगी विषय. यावेळी तिने वन रुम किचनमधील आई- बाबांच्या प्रायव्हसीबद्दल वक्तव्य केले आहे. हेमांगीने विविध माध्यमातून विविध भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण केली आहे. नुकतंच हेमांगीने ‘प्लॅनेट मराठी’वरील ‘त्या नंतर सर्व काही बदललं’ या पॉडकास्टमध्ये बोलताना तिच्या बालपणीच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.
यावेळी हेमांगी म्हणाली कि, ‘आम्ही १८० च्या खोलीत राहायचो. माझी आई सातवी शिकलेली आणि गावात राहिलेली आहे. तर बाबा एलएलबी झालेयत. आमच्या घरात बराच मोकळेपणा होता. त्यामुळे ‘टायटॅनिक’, ‘दयावान’सारखे सिनेमे आम्ही एकत्र बसून पाहिलेत. किसिंग सीन लागला की रिमोटची शोधाशोध, इंटिमेट सीन सुरु झाला की पळापळ वगैरे हे असलं कधीच आमच्या घरात झालं नाही. उलट आम्ही एकत्र बसून असे सीन पाहत बसायचो. हे आता पहायचं नाही, हे वाईट आहे असं आमच्या पालकांनी आम्हाला कधीच म्हटलं नाही. ही जवळपास ९३- ९४च्या काळातली गोष्ट आहे. तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या घरी हे लपवलं जातं, याचा मला थांगपत्ताच नव्हता. मला तर तेव्हासुद्धा हे सगळं अगदी नॉर्मल वाटायचं.
पुढे, ‘त्यावेळी सर्वचजण वन रुम किचनसारख्या घरात रहायचे. त्यामुळे आई- बाबा यांची प्रायव्हसी वगैरे हे सगळं आम्ही पाहिलंय. जेव्हा मी पहिल्यांदा ते पाहिलं, तेव्हा मी ताईला विचारलं की, ‘आई- बाबा नेमकं काय करत होते..?’ तेव्हा ताईने ‘हे असंच असतं आणि या गोष्टींमुळेच आपण जन्माला आलेलो आहोत असे सांगितले. अनेकदा आपण जागे असतो आणि त्यामुळे सर्वांनीच या गोष्टी पाहिलेल्या असतात. हे केल्यामुळेच आपचा जन्म झालेला आहे याची समज तर प्रत्येकाला यायलाच हवी’.
Discussion about this post