हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलाकारांसाठी रंगभूमी हीच माय अन हीच कर्मभूमी. त्यामुळे रंगभूमीवर जगणाऱ्या कलाकारांना तीच धाय मोकलून रडणंही दिसत. एखादं नाट्यगृह उभारणं जितकं सोप्प, तितकीच त्याची देखभाल करणं अवघड असतं. नाट्य गृहाच्या वीज बीलासाठी मोठी रक्कम खर्च करावी लागत असते. ही बाब विचारात घेऊन मराठी अभिनेते प्रशांत दामले यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे साकडे घातले आहे. ‘पंतप्रधान सौर उर्जा योजने’अंतर्गत आपल्या राज्यातील ४८ नाट्यगृहांना मदत करावी, अशी मागणी दामले यांनी केली आहे.
या मागणीच्या पूर्ततेसाठी प्रशांत दामले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांना निवेदन केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक गेल्या रविवारी १६ एप्रिल २०२३ रोजी पार पडली आणि या निवडणुकीत प्रशांत दामले यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ पॅनलने विजय मिळवला. याच पार्श्वभूमीवर प्रशांत दामले यांनी एका वृत्त माध्यमासोबत संवाद साधला असताना त्यांनी हि माहिती दिली.
अनेक निर्माते मुंबई महानगर पालिकेकडे ‘नाट्यगृहांचे भाडे कमी करावे’ अशी मागणी करताना दिसतात. त्यामुळे या आणि अशा अनेक प्रश्नांवर कायम स्वरुपी तोडगा काढण्याची नितांत गरज आहे. केंद्र आणि राज्य सरकारने नाट्यसृष्टीला मदतीचा हात दिला तर यावर तोडगा काढणे शक्य होईल आणि रंगभूमीला दिलासा मिळेल, अशी आशा असल्याचे प्रशांत दामले यांनी सांगितले. राज्यभरातले कलाकार अभिनय कौशल्य सादर करण्यासाठी मुंबईत येतात. या कलाकारांना मुंबईतील घराचे भाडे परवडत नाही. तर पालिकेच्या बंद पडलेल्या शाळांची दुरुस्ती करून त्या कलाकारांच्या निवाऱ्यासाठी उपलब्ध करून द्याव्या, अशीही मागणी दामले यांनी केली आहे.
Discussion about this post