हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर’ हा पुरस्कार ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना जाहीर झाला आहे. तर चित्रपट आणि नाटक क्षेत्रातील योगदानासाठी मराठी अभिनेता प्रसाद ओक याला ‘मास्तर दीनानाथ मंगेशकर’ या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. येत्या २४ एप्रिल २०२३ रोजी, मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. या निमित्ताने अभिनेता प्रसाद ओकने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता प्रसाद ओक हा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्यामुळे हि आनंदाची बाब त्याने आवर्जून आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. हि पोस्ट शेअर करताना त्याने ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराचे परिपत्रक शेअर केले आहे. त्यासोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘अत्यंत आनंदाची बातमी… या वर्षीचा… “मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार” मला जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला परमानंद झाला आहे. माझ्या चंद्रमुखी व धर्मवीर या दोन्ही चित्रपटांच्या संपूर्ण टीम चे आणि मायबाप प्रेक्षकांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. मला या पुरस्कारायोग्य समजल्याबद्दल दीनानाथ स्मृती प्रतिष्ठान चा आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांचा मी शतशः ऋणी आहे…!!! अत्यंत मानाचा असा हा पुरस्कार मी माझ्या बाबांना समर्पित करतो…!!!
अभिनेता प्रसाद ओक हा गेली अनेक वर्ष मनोरंजन क्षेत्रात नाटक, मालिका, चित्रपट अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेल्या काही काळात त्याने चंद्रमुखी सारखा दर्जेदार चित्रपट एक दिग्दर्शक म्हणून प्रेक्षकांना दिला. तर धर्मवीर सारख्या चित्रपटातून त्याने एक उत्तम नट असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. शिवाय त्याने एक लेखक म्हणूनही प्रेक्षकांसमोर आपली लेखन शैली प्रस्तुत केली आहे. अभिनेता प्रसाद ओकच्या कामाबद्दल बोलायचं तर आगामी काळात तो ‘धर्मवीर २’ या चित्रपटात दिसणार आहे.
Discussion about this post