Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

पुन्हा कल्ला करायला.. ‘आले रे पोश्टर बॉईज 2’; ढोल ताशाच्या गजरात 25 फूट पोस्टरचे अनावरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Poshter Boyz 2
0
SHARES
561
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘पोश्टर बॉईज’ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात एक सामाजिक विषय, त्याचे गांभीर्य न जाता विनोदी पद्धतीने चित्रपटात मांडण्यात आला. या धमाल कॉमेडी चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केल्यामुळेच चित्रपट सुपरहिट झाला. प्रेक्षकांच्या या प्रेमामुळेच आता हे बॉईज पुन्हा एकदा नव्या रूपात नव्या ढंगात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय मयेकर दिग्दर्शित ‘आले रे पोश्टर बॉईज २’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hello Bollywood (@hellobollywood.in)

‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’ अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटात पुन्हा एकदा दिलीप प्रभावळकर, हृषिकेश जोशी आणि अनिकेत विश्वासराव हे बॉईज पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे भव्य पोस्टर लाँच ढोल ताशाच्या गजरात मुंबईतील दादर परिसरात करण्यात आले. यावेळी चित्रपटाच्या २५ फूट पोस्टरचे अनावरण करण्यात आले. संपूर्ण दादर परिसर यावेळी गर्दीने गजबजलेला होता. ‘आले रे पोश्टर बॉईज २’चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की ! त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये ‘फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली’ असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत. निर्मात्या सेजल शिंदे म्हणतात, ‘हल्ली मराठीमध्ये खूप नवनवीन विषय हाताळले जात आहेत. चित्रपट हा केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून काही सामाजिक प्रबोधन होणेही गरजेचे असते. आले रे पोश्टर बॅाईज २’ सारख्या चित्रपटांमधून दोन्ही गोष्टी साध्य होतात.’’ तर निर्माते अविनाश वडगावकर म्हणतात, ‘’पहिल्या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता या चित्रपटाची मजा दुप्पट झाली आहे. कलाकारही सर्वोत्कृष्ट असून कथाही उत्तम आहे. असे विषय बघायला प्रेक्षकांना आवडतात. त्यामुळे आम्हाला आशा आहे, ‘पोश्टर बॅाईज २’ ही सिनेप्रेमींना आवडेल.’’

Tags: Aniket VishwasraoDilip PrabhavalkarInstagram PostPoster Boys 2Shreyas talpadeUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group