हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी एक उत्तम अभिनेत्री, निवेदिका आणि आता व्यावसायिका देखील झाली आहे. प्राजक्ता माळीचं ‘प्राजक्तराज’ हे पारंपरिक दागिन्यांचं कलेक्शन कमालीचं चर्चेत आहे. त्यात आज अक्षय तृतीया. अर्थात साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अतिशय सुंदर मुहूर्त. त्यामुळे आजच्या दिवसाचे औचित्य साधून प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून अत्यंत महत्वाची आणि एक मोठी घोषणा केली आहे. याबाबत तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
अभिएन्ट्री प्राजक्ता माली सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. त्यामुळे अनेकदा सोशल मीडियावर ती विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट आणि प्राजक्तराजविषयी माहिती देत असते. तर आज अक्षय्य तृतीयेनिमित्त प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ कलेक्शनच्या माध्यमातून लग्नाच्या खरेदीसाठी खास ‘लग्नसराई संच’ समोर आणला आहे. प्राजक्ताने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन याविषयी पूर्ण माहिती दिली आहे. या संचात लग्नात नवरीच्या मनात जे जे दागिने परिधान करायचं असतं ते सगळे दागिने आहेत.
आता या संचात नेमक्या कोणत्या दागिन्यांचं कलेक्शन आहे हे प्राजक्तराज’च्या अधिकृत वेबसाईटवर गेले असता लगेच जाणून घेता येईल. आजवर प्राजक्ताने प्राजक्तराजच्या माध्यमातून अनेक पारंपरिक आणि अस्सल मराठमोळ्या दागिन्यांची आपल्यासोबत भेट घालून दिली आहे. अशातच आता नवरीच्या मनाजोगता तिला हवा तसा संच प्राजक्ताने आणला आहे. त्यामुळे नक्कीच इतर दागिन्यांप्रमाणे आता हे दागिने देखील ग्राहकांच्या पसंतीस पडतील. प्राजक्ताला लग्नसराई संचाची कल्पना हि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे लेखक – दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी दिल्याचे तिने स्वतः सांगितले आहे. आता या ‘लग्नसराई संचा’ला प्राजक्ताचे चाहते नक्कीच पसंती देतील अशी तिने आशा व्यक्त केली आहे.
Discussion about this post