हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. ज्यामध्ये अभिनेता अंकुश चौधरी हा शाहीर साबळेंच्या भूमिकेत दिसतो आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत आणि असे असताना केदार शिंदे यांनी चित्रपटाचा एक प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे. जो पाहून चित्रपटाबाबत आणखीच उत्सुकता वाढणार आहे. या खास प्रोमोसोबत एक खास कॅप्शन लिहीत केदार शिंदेनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
केदार यांनी शेअर केलेल्या या प्रोमो व्हिडिओमध्ये शाहीर साबळे यांच्या कार्यक्रमातील एक प्रसंग आहे. ज्यामध्ये शाहीर साबळेंना ‘सोंगाड्या विचारतोय, नारदमुनी.. नेता म्हणजे काय..?’ यावर उत्तर देत शाहीर म्हणतात, ‘नेता म्हणजे.. जो जनतेला भूल थापा देता.. सगळ्या जनतेला आपल्या मागून नेता.. आणि सगळी जनता खड्ड्यात गेली कि जो परत येता.. तो नेता..’ त्या काळच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारा असा हा प्रहसन करणारा व्हिडिओ आहे. ज्याला वास्तवाची देखील किनार जोडण्यात आली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून यासोबत केदार यांनी एक सणसणीत कॅप्शन लिहिलं आहे.
केदार शिंदे यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘गेली ४ वर्ष मी या सिनेमासाठी काम करतोय. याक्षणी माझी मनस्थिती काय असेल..? हे सांगणं कठीण आहे. “महाराष्ट्र शाहीर” हा माझ्यासाठी सिनेमा नाही, एक जबाबदारी आहे. पुढच्या पिढीला शाहीर कळावेत यासाठी अट्टाहास!! नाहीतर उद्या आपल्या पोरांना गोत्र विचारलं तर ते.. Netflix किंवा Amazon सांगायचे. यासाठी एक मदत हवी. प्रोमो पाठवीन ते तुमच्या लोकांना फॉरवर्ड करा. Groups ना forward करा. २८ एप्रिल २०२३ महाराष्ट्र शाहीर बघायचा! ही चळवळ उभी करायची आहे…’
Discussion about this post