हॅलो बॉलीवूड ऑनलाईन । हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रीटा विल्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्याने आपल्या कोरोना विषाणूबद्दल सोशल मीडियावर बातमी दिली होती. आता टॉमने पत्नीसह पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि आपल्या आरोग्याशी संबंधित अपडेट्स दिली आहेत तसेच प्रार्थना केल्याबद्दल चाहत्यांचे आभार मानले आहेत.
टॉमने लिहिले- हॅलो, मी आणि रीटा आमची चांगली काळजी घेत असलेल्या सर्वांचे आभार मानू इच्छितो. आम्ही कोरोना व्हायरसने ग्रस्त आहोत आणि हा रोग इतर कोणालाही पसरू नये म्हणून आम्हाला वेगळे ठेवण्यात आले आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांच्यासाठी हा आजार गंभीर असू शकतो. हे टाळण्यासाठी, आम्ही तज्ञांच्या सल्ल्याचे अनुसरण करू शकतो आणि एकमेकांची काळजी घेऊ शकतो, बरोबर ना ? लक्षात ठेवा, सद्याच्या सर्व घटना असूनही बेसबॉल नाहीये. शेअर केलेल्या फोटोमध्ये टॉम आणि त्याची पत्नी बेसबॉल कॅप घातलेली असून रिलॅक्स मूडमध्ये दिसत आहेत.
१२ मार्च रोजी त्यांनी हातमोज्यांसह एक फोटो शेअर करताना, त्यांच्या कोरोना विषाणूबद्दल माहिती दिली होती. यानंतर त्याच्या मुलाच्या आईवडिलांच्या प्रकृतीसंदर्भात अपडेट्स दिले होते. टॉम आणि त्याची पत्नी सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहेत.
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १३४,३१७ लोक मरण पावले आहेत. भारतात कोरोना विषाणूची ७४ जणांना लागण झाल्याची पुष्टी मिळाली आहे. त्यातील एकाचा गुरुवारी मृत्यू झाला.
जागतिक आरोग्य संघटनेतर्फे कोरोना विषाणूविषयी अपडेट्स प्रसिद्ध केली जात आहेत. सुरक्षित राहण्याचे उपाय, बचावाच्या पद्धती सल्लागारात नमूद केल्या आहेत. या व्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या आरोग्याबाबत सुरक्षित रहाण्याचे आवाहनही केले आहे. एकीकडे बचावाच्या पद्धती अवलंबल्या जात आहेत, तर दुसरीकडे राजधानी दिल्लीमध्ये कोरोना विषाणूचा साथीचा रोग जाहीर झाला आहे. येथील शाळा महाविद्यालये आणि अगदी सिनेमागृह ३१ मार्चपर्यंत बंद आहेत.