हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी चित्रपट उद्या २८ एप्रिल २०२३ रोजी शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता पहायला मिळाली आहे. अखेर आता प्रतिक्षा संपायला काहीच तास बाकी राहिले आहेत.
हा चित्रपट महाराष्ट्राच्या मातीतील थोर लोककलावंत शाहीर स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचा जीवनपट आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी टिझर, ट्रेलर आणि गाण्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं आहे. यातील ‘बहरला हा मधुमास’ गाण्याने तर परदेशातही कल्ला केलाय. दरम्यान टांझानियाचा रील स्टार किली पॉल देखील या गाण्यावर थिरकताना दिसला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर फारच ट्रेंडिंगमध्ये आहे. विविध राज्य आणि परदेशात या गाण्यावर रील बनवले जात आहेत. अनेक कलाकारदेखील या या गाण्यावर थिरकले आहेत. आतापर्यंत या गाण्यावरील हजारो रील्स व्हायरल झाल्या असतील. नुकतंच या गाण्यावर टांझानियाचा रील स्टार किली पॉल आणि त्याची बहीण निमा पॉल थिरकताना दिसले आहेत. या लोकप्रिय इंस्टा स्टार बहीण भावंडाला शेवटी या गाण्याचा नाद लागलाच. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हि इंस्टा स्टार बहीण भावाची जोडी नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. बॉलिवूड, टॉलिवूड, हॉलिवूड मधील सर्व लोकप्रिय गाण्यांवर किली आणि निमा रील बनवताना दिसतात. किली आणि नीमा यांनी ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्राम हॅण्डलवर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘या गाण्यावर डान्स केला, खूप एन्जोय केलं.. मजा आली’. या व्हिडिओवर अनेक मराठी प्रेक्षकांनी कमेंट करत दोघांवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. अनेकांनी ‘जय महाराष्ट्र’ अशी कमेंट केली आहे.
Discussion about this post