हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर हि अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी असली तरीही तिने स्वबळावर आता स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पूर्वी केवळ श्रीदेवी किंवा बोनी कपूर यांची मुलगी म्हणून ओळखली जाणारी जान्हवी तिच्या आयकॉनिक अंदाजामुळे चर्चेत असते. अभिनयापेक्षा जास्त जान्हवी तिच्या फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते. पण सध्या सोशल मीडियावर तिचा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिची तुलना थेट चित्र विचित्र फॅशन करणाऱ्या उर्फी जावेदसोबत केली आहे. या व्हिडिओतील जान्हवीचा ड्रेस पाहून नेटकऱ्यांची सटकली आहे.
आपल्या फॅशन आणि स्टाईलमूळे जान्हवी युथमध्ये चर्चेत असते. पण गेल्या काळात तिने केलेले लूक पाहून सोशल मीडियावर चाहत्यांपेक्षा जास्त ट्रोलर्सच्या नजरेत ती पडते आहे. जान्हवी अनेकदा विविध इव्हेंटमध्ये हजेरी लावताना दिसत असते. अशाच एका इव्हेंटमधील तिचा लूक ट्रोल केला जात आहे. जान्हवी कपूरने एका अवॉर्ड सेरेमनीला हजेरी लावली. यावेळी तीने हिरव्या रंगाचा लॉन्ग ड्रेस परिधान केला होता. जो पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. यावर कमेंट करत एका नेटकऱ्याने म्हटले आहे, ‘घरातून बाहेर पडताना किमान स्वतःला एकदा आरशात बघत जा’. याशिवाय अनेकांनी जान्हवीची तुलना थेट उर्फी जावेदसोबत केली आहे.
एकाने कमेंट करत लिहिलं आहे कि, ‘सिक्रेटली सगळेच उर्फीपासून प्रेरणा घेत आहेत’. तर आणखी एकाने लिहिलंय कि, ‘डिझायनर जे देतात, ते घालून घराबाहेर कसे काय पडतात..? यांना स्वतःची अक्कल नाहीये का?’. तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘लवकरच हिची उर्फी नंबर २ होणार आहे’. तर आणखी एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘तू काहीही कर पण तू काही नोरा फतेही होऊ शकणार नाहीस’. याशिवाय आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘आज जर श्रीदेवी जिवंत असती तर तिने हिच्या २ कानाखाली लगावल्या असत्या’.
Discussion about this post