Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

ईशान- मानवच्या ‘त्या’ नात्यात कुणी तिसरं आलंय का..?; ‘चिकटगुंडे 2’चा तिसरा एपिसोड प्रदर्शित

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 28, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Chikatgunde 2
0
SHARES
48
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काही दिवसांपूर्वीच प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेली वेबसिरीज ‘चिकटगुंडे २’ ही प्रेक्षकांच्या प्रचंड पसंतीस उतरताना दिसत आहे. नुकतेच त्याचे दोन एपिसोड्स प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. यानंतर आता आज २८ एप्रिल २०२३ रोजी, शुक्रवारी ‘चिकटगुंडे २’ या वेब सिरीजचा तिसरा एपिसोड प्रदर्शित झाला आहे. यामध्ये ईशान आणि मानव यांच्या प्रेमाचं नातं आता त्यांच्या नातेवाइकांसमोर येणार आहे. शिवाय तिसरं कुणाच्या येण्याची चाहूल लागल्याने त्यांच्या नात्यात चढउतार येताना दिसणार आहे. पुढे काय घडणार हे या भागात समजेल.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

याआधी पहिल्या सीझनमध्ये ईशान आणि मानव एकमेकांच्या प्रेमात असून ईशानच्या घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर त्यांचे ‘हे’ नाते ते मान्यही करतात, असे दाखवण्यात आले आहे. यानंतर आता रिलीज झालेल्या भागात ईशान आणि मानवचे नाते नातेवाईकांसमोर येणार असून त्यांच्या प्रतिक्रिया कशा असणार..? त्या दोघांना आणखी कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागणार..? हे येत्या एपिसोडमध्ये पहायला मिळणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

याशिवाय मानव आपल्याव्यतिरिक्त इतर कुणाच्या तरी सानिध्यात जास्त आहे अशी ईशानला धाकधूक वाटू लागली आहे आणि यामुळे त्याच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर होईल का..? ते पाहण्यासाठी हा एपिसोड जरूर पहा. प्लॅनेट मराठी आणि भाडिपा प्रस्तुत या सीरिजमध्ये ईशानची भूमिका सुशांत घाडगेने तर मानवची भूमिका चैतन्य शर्माने साकारली आहे.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi OTT (@planetmarathiott)

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर ‘चिकटगुंडे २’ या सिरीज बद्दल बोलताना म्हणाले कि, ‘ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोडला भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना आवडेल, असा उत्तम कंटेन्ट देणे ही भाडिपाची खासियत आहे. मुळात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्ग पाहू शकेल, अशी ही सीरिज आहे. तिसरा भाग आणि येणारे पुढील भागही प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. मागील भागातील सरप्राईज या भागात उघड होणार आहे’.

Tags: Instagram PostNew episodesOTT PlatformPlanet MarathiViral VideoWeb Series
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group