Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘नवा शो, नवे प्रश्न, नवी चर्चा … त्या नंतर सगळं बदललं’; ‘PLANET मराठी’च्या पॉडकास्ट शोला प्रेक्षकांची पसंती

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 29, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
36
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्लॅनेट मराठी नेहमीच नवनवीन. वेगळ्या विषयांद्वारे प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करणारे विषय घेऊन भेटीस येत असते. कोण तीही वेबसीरिज असो किंवा कोणताही टॉक शो त्याला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभतेच. आता प्लॅनेट मराठी प्रस्तुत ”त्या’ नंतर सगळं बदललं’ हा नवाकोरा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस आला असून या शोची सूत्रसंचालिका सानिका मुतालिक आहे. या शोमध्ये कलाकारांच्या आयुष्यात नक्की कोणत्या ‘त्या’ गोष्टीनंतर सगळं बदलतं, विजयाच्या शिखरावर असताना पाठी वळून जेव्हा ते बघतात, तेव्हा त्यांना कसं वाटतं, या सगळ्या रंजक गोष्टींचा खुलासा या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांसमोर होणार आहे. या शोचे ३ एपिसोड्स प्रदर्शित झाले असून हेमांगी कवी, आदिनाथ कोठारे आणि सुयश टिळक यांनी या शोमध्ये हजेरी लावून अनेक गंमतीदार, मजेदार तर कधी भावनिक करणारे अनेक किस्से सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Planet Marathi प्लॅनेट मराठी (@planet.marathi)

‘त्या नंतर सगळं बदललं’च्या पहिल्या एपिसोडमध्ये सुयश टिळकने त्याचा फोटोग्राफर ते अभिनेता होण्यापर्यंतचा प्रवास सांगितला तर दुसर्‍या एपिसोडमध्ये हेमांगी कवीने ट्रेंडमुळे होणार्‍या ट्रोलिंगचा कसा सामना करावा लागला, त्याचा किस्सा सांगितला. आदिनाथ कोठारेमध्ये आणि जीजामध्ये घडणार्‍या अनेक गंमतीजंमतींचे भन्नाट किस्से ‍तिसर्‍या एपिसोडमध्ये बघायला मिळतील. आगामी एपिसोडमध्ये कोणता नवीन कलाकार सहभागी होणार आणि त्याचे किंवा तिचे कोणते नवीन किस्से ऐकायला मिळणार, यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार असून लवकरच नवीन एपिसोड प्लॅनेट मराठीच्या यूट्यूब चॅनेलवर पाहता येतील. दर रविवारी सकाळी ११ वाजता प्रदर्शित होणाऱ्या या शोचे पाच भाग आहेत.

View this post on Instagram

A post shared by SUFLET (@___suflet__)

प्लॅनेट मराठीचे संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ‘प्रेक्षकांना लहान व्हिडिओ, पॉडकास्ट शो पाहायला आवडतात. कलाकारांच्या आयुष्यात घडलेले अनेक रंजक, मजेदार किस्से, त्यांच्यासोबत पडद्यामागे घडलेल्या अनेक मजेदार घटना जाणून घ्यायच्या असतात. चाहत्यांच्या याच विषयाला केंद्रस्थानी ठेवून त्यांची आवड जोपासत आम्ही हा पॉडकास्ट शो प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आलो आहोत. कलाकारांच्या आयुष्यात नेमकं काय घडतं, त्यांना काय आवडतं, कोणत्या कारणामुळे ते आज इथपर्यंत पोहोचले, या सगळ्या गोष्टी या पॉडकास्ट शोद्वारे प्रेक्षकांना समजतील’.

Tags: Akshay BardapurkarInstagram PostOTT PlatformPlanet MarathiTalk Show
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group