हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस फेम अभिनेत्री आरती सिंग सोशल मीडियावर फार सक्रिय असते. ती नेहमीच आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी विविध पोस्ट शेअर करत असते. तिच्याबाबत नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. मित्र मैत्रिणींसोबत नेहमीच चिल करताना स्पॉट होणारी आरती सध्या रुग्णालयात उपचार घेते आहे. याच कारण ठरलंय हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणे. होय. आता नेमकं असं तिच्यासोबत काय घडलं कि हॉटेलातून ती थेट रुग्णालयात पोहोचली ते जाणून घेऊया.
मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्री आरती सिंग तिच्या २३ एप्रिलला जेवायला हॉटेलमध्ये गेली होती. त्यावेळी तिच्या हातून एक काचेचा ग्लास पडला आणि ते काचेचे तुकडे तिच्या हातात घुसले. ज्यामुळे ती लगेचच डॉक्टरांकडे गेली आणि तिला कळलं की एक नाही तर सात काचेचे तुकडे तिच्या हातात घुसले आहेत. त्यानंतर डॉक्टरांनी सर्जरी करत ते तुकडे काढले आणि सात टाके घातले. सुरुवातीला काचेच्या तुकड्यांमुळे आरतीला जखम झाल्याचे मला समजले देखील नव्हते.
आरतीने या घटनेचा खुलासा करत सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने हॉस्पिटलमधील एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये आरती आराम करत तिची सीरिअल पाहतेय. हा व्हिडीओ शेअर करत तिने एक सकारात्मक पोस्ट लिहिली आहे. ‘हा आठवडा खूपच कठीण होता. काचेचे तुकडे माझ्या हातात घुसल्याने माझी सर्जरी पार पडली. माझ्या नव्या मालिकेचा पहिला एपिसोड मला हॉस्पिटलमधून पाहावा लागला. आयुष्यात अनेक चढ- उतार येत असतात. माझी मालिका सुरू होताच मला ब्रेक घ्यावा लागल्याने, मला वाईट वाटतंय. पण मी वाघीण आहे लवकरच दमदार कमबॅक करेल’, अशी पोस्ट आरतीने शेअर केली आहे.
Discussion about this post