हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या टीझरने सर्वत्र एकच खळबळ उडवली होती. मात्र त्यानंतर या सिनेमाविरोधात विविध संघटना उभ्या राहिल्या आणि हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला. आता या सिनेमाची रिलीज डेट अगदी तोंडावर असताना जोरदार टीका, विरोध आणि प्रदर्शनावर बंदीची मागणी केली जात आहे. काँग्रेससह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची युवा शाखा DYFI आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) च्या युथ लीगने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.
Heart breaking and gut wrenching stories of 32000 females in Kerala!#ComingSoon#VipulAmrutlalShah @sudiptoSENtlm @adah_sharma @Aashin_A_Shah#SunshinePictures #TheKeralaStory #UpcomingMovie #TrueStory #AdahSharma pic.twitter.com/M6oROuGGSu
— Adah Sharma (@adah_sharma) November 3, 2022
या चित्रपटाची कथा हि चार महिलांभोवती फिरते. ज्यांना मुस्लिम धर्मात परिवर्तन करून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील केले गेले. या सिनेमाच्या टीझरमध्ये अभिनेत्री अदा शर्मा दिसते आहे. ती म्हणतेय कि, ‘शालिनी उन्नीकृष्णनला फातिमा बा बनवून दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले. माझ्यासारख्या केरळ राज्यातून गायब झालेल्या ३२ हजार महिलांची हि गोष्ट आहे’. अशा आशयाचा हा टिझर पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली आणि धर्मांतराची हि भयावह घटना मांडणारा हा चित्रपट खरा कि खोटा यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत सोशल मीडियावर दोन गट तयार झाले असताना आता हा चित्रपट प्रदर्शित होऊन देणार नाही, अशी पक्की भूमिका काही संघटनांनी घेतली आहे.
या चित्रपटात केरळ राज्याचे नकारात्मक चित्रण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत राजकीय पक्षांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला आहे. सीपीआय-एम आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगने केरळमध्ये चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. या संपूर्ण वादावर चित्रपट निर्माते विपुल शाह यांनी एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीशी संवाद साधत म्हटले कि, ‘हा चित्रपट एका मुलीच्या सत्यघटनेवर आधारित आहे. लव्ह जिहाद वगैरे हे सगळे लोकांनी तयार केलेले राजकीय शब्द आहेत.
आमचा चित्रपट या पीडित मुलींच्या जीवनावर आधारित आहे. आम्ही सत्य दाखवत आहोत. आता यासाठी तुम्हाला कोणता शब्द निवडायचाय तो तुमचा निर्णय आहे. या पीडित मुलींसाठी आपण आवाज उठवला पाहिजे हेच या चित्रपटात सांगितलं आहे’. ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बलानी, सिद्धी इदनानी या चार अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post