हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। TDM हा चित्रपट गेल्या शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे कथानक आणि कलाकारांचा सहज सोपा अभिनय प्रेक्षक अन समीक्षकांना आवडला असला तरीही हा चित्रपट थिएटरमध्ये काही टिकेना. या चित्रपटाला राज्यभरातील विविध थिएटरमध्ये शो दिले जात नसल्याने TDM बाजूला काढला जात आहे.
खरंतर ‘ख्वाडा’, ‘बबन’ फेम भाऊराव कऱ्हाडेंचा TDM म्हणून हा चित्रपट राज्यभर गाजणार अशी आशा होती. मात्र या चित्रपटाला थिएटरमध्ये शो मिळत नसल्याने चित्रपटाच्या टीमला मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी TDM चे बरेच शो हाउसफुल झाले होते. लोकांना हा चित्रपट पाहण्याची इच्छा आहे पण केवळ शो कमी असल्याने TDM थिएटरबाहेर होतो आहे.
या अशा परिस्थितीमुळे चित्रपटाची संपूर्ण टीम हताश निराश झाली आहे. नुकतंच TDM चित्रपटाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे आणि मुख्य कलाकार कालिंदी निस्तने व पृथ्वीराज यांनी तमाम प्रेक्षकांना हात जोडून या दयनीय परिस्थितीची कल्पना दिली. हा सिनेमा प्रेक्षकांना आवडतोय, पण केवळ शो नसल्याने प्रेक्षकांना माघारी जावं लागतंय. हे पाहून चित्रपटाची टीम भावुक झाली. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत. यावेळी ‘आमच्यावर प्रेशर आहे’, असं म्हणत थिएटर मालकांनी हात वर केले. पण अजून थिएटर मालकांवर नेमकं कसलं प्रेशर आहे..? याचा काही खुलासा झालेला नाही.
मात्र TDM या चित्रपटाची अवस्था पाहता मराठी सिनेमा संपतोय का काय..? अशी एक भीती निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीबाबत बोलताना भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी ‘यापुढे वैयक्तिक माझी सिनेमा करण्याची इच्छा नाही’ असे म्हटले आहे. TDM च्या प्रीमियर सोहळ्याला मोठ्या संख्येने इन्फ्लुएन्सर्स आले होते.
केवळ भाऊराव यांची भेट घेण्यासाठी हि गर्दी जमा झाली होती. भाऊराव कऱ्हाडें इन्फ्लुएन्सर्सला भेटले. सगळ्यांसोबत त्यांनी सेल्फी काढले. एवढंच काय तर काहींसोबत त्यांनी रीलदेखील बनवल्या. असे बोलले जात आहे कि, येत्या काळात इन्फ्लुएन्सर्सला घेऊन भाऊराव मोठा सिनेमा बनवणार आहेत. पण सद्यपरिस्थिती पाहता भाऊराव पुढे काय पाऊल उचलणार हे सांगणे कठीण आहे.
Discussion about this post