हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध नाटक, मालिका, चित्रपट, सीरिजच्या माध्यमातून कलाकार मंडळी देशात ठिकठिकाणी आणि अगदी परदेशातही फिरतीवर असतात. कथानकाला शोभणारी अशी लोकेशन्स शोधून कलाकारांची फौज त्या त्या ठिकाणी काम करत असते. सध्या अशाच एका चित्रपटाच्या शूटिंगचे निमित्त असल्याने मराठी अभिनेता शशांक केतकर हा लंडनमध्ये गेला आहे. शूटिंगमध्ये व्यस्त असताना काहीसा वेळ तो वैयक्तिक स्वतःवर खर्च करताना दिसतो आहे. विविध ठिकाणी फिरताना आणि तेथील फोटो, व्हिडीओ शेअर करताना दिसतोय. पण या सगळ्यात आता तो तिकडेच शिफ्ट होण्याचा विचार करू लागला आहे. याबाबत त्याने स्वतःच एक पोस्ट शेअर केली आहे.
अभिनेता शशांक केतकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे विविध फोटो, व्हिडीओ, आगामी प्रोजेक्ट्सची माहिती, आयुष्यातील लहान मोठे प्रसंग तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. सध्या तो लंडनमध्ये शूटिंग करत असताना ठिकठिकाणी फिरत आहे. यावेळी त्याच्या नजरेला पडणारी प्रत्येक वेगळी गोष्ट तो शेअर करत आहे. दरम्यान शशांकने अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याने एका हॉटेलच्या दरवाजावर चिकटवलेल्या जाहिरातीवर लक्ष केंद्रित केले आहे.
या जाहिरातीत डोसा शेफ नेमणे आहे असे लिहिले आहे. सोबतच वर्षाला २८,००० पाऊंड अर्थात भारतीय चलनानुसार २८ लाख रुपये पगार देण्यात येईल असेही लिहिले आहे. हि जाहिरात दाखवत शशांक म्हणतोय, ‘तसं माझं बरं चाललंय.. पण तरीही व्हावं का शिफ्ट..?’. याशिवाय कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय, ‘डोसे करता येतात??? मग या तुम्ही.. २८,००,००० रुपये पगार आहे!’. शशांकची हि मजेशीर पोस्ट चांगलीच व्हायरल होत असून महिला वर्ग यावर विविध कमेंट करत आहेत. एका युजरने लिहलंय कि, ‘बघा आमच्यासाठी काही होतंय का तिकडे..घरी डोसे बनवण्याचे काय मिळेना तिथ मिळतंय तर जावं’. तर आणखी एका युजरने म्हटलंय, ‘उगाच एव्हढं शिक्षण घेत बसले.. लहानपणी दोषे बनवायला शिकायला हवं होत’.
Discussion about this post