हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अगदी दणाणून सोडला आहे. या चतुरपटाच्या घोषणेपासून प्रेक्षकांच्या मनात असणारी उत्सुकता आता रिलीजनंतर सार्थकी ठरली आहे. चित्रपटाचे वास्तवदर्शी कथानक आणि शाहिरांची जीवनगाथा प्रेक्षकांना त्या काळात घेऊन जात आहे. जिथे लोकांच्या मनात क्रांतीची ज्योत पेटवण्याचे काम शाहीर करत होते. ते केवळ कलावंत नव्हते तर लोककलावंत होते. याच लोककलावंताचे चित्रपटात प्रदर्शित न झालेले ‘मी तर होईन चांदणी’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे. ज्याला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात शाहिरांच्या गाण्यांनी आणखीच चार चांद लावले आहेत. हा चित्रपट एक उत्तम संगीत पर्वणी आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी अतिशय उत्तम केले आहेत. तर अभिनेता अंकुश चौधरीने शाहीर साबळे आणि सना शिंदेने भानुमती साबळे यांची भूमिका अव्वल साकारली आहे. अंकुश आणि सना अर्थात शाहीर साबळे व त्यांच्या पत्नी भानुमती यांच्यावर चित्रित केलेलं ‘मी तर होईन चांदणी’ हे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटातून प्रदर्शित न झालेले हे गाणे उशिराने समोर आले असले तरीही फड गाजवताना दिसत आहे.
या गाण्यात भानुमती साबळे काव्य रचना करताना दिसत आहेत. तर शाहीर साबळे त्या काव्याला चाल लावून लोकांसमोर आणताना दिसत आहेत. एका स्टुडिओमध्ये गाण्याचे रेकॉर्डिंग सुरु आहे. तर मधून मधून शाहिरांच्या संसाराची झलक दाखवली आहे. या गाण्याला आघाडीचे संगीतकार, गायक अजय- अतुल यांनी संगीत दिले आहे. तर शाहीर रामानंद उगले यांच्या आवाजात हे गाणे ऐकताना फारच भारी वाटत आहे. गाण्याची लयबद्धता अजिबात हलवता अतिशय सुंदर पद्धतीने गाण्याचे सादरीकरण झाले आहेत. अगदी एका दिवसात या गाण्याने ८० हजार व्ह्यूजचा टप्पा ओलांडला आहे. यावरून गाण्याला मिळणारी पसंती लक्षात येत आहे.
Discussion about this post