Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

मी एवढ्या मोठ्या सन्मानासाठी पात्र आहे का..?; किरण मानेंनी ‘तो’ पुरस्कार जाहीर होताच शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 4, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Kiran Mane
0
SHARES
57
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किरण माने सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असणारे अभिनेते आहेत. विविध विषयांवर व्यक्त होत ते नेहमीच पोस्ट शेअर करत असतात. मनोरंजन विश्वातील घडामोडी ते राजकीय हालचालींवर किरण माने बेधडक बोलतात. अनेकदा ते फुले- शाहू- आंबडेकर यांचे विचार आपल्या लेखणीतून मांडण्याचा प्रयत्न करत असतात. नुकताच त्यांना त्यांच्या सामाजिक योगदानासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबियांकडून दिला जाणारा ‘सम्यक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या निमित्त त्यांनी एक पोस्ट लिहिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

यामध्ये किरण मानेंनी लिहिले आहे कि, ‘ॲड. प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिला जाणारा ‘सम्यक पुरस्कार’ यावर्षी मला जाहीर झाला आहे. १० मे रोजी पुण्यात कष्टकर्‍यांचे कैवारी मा. डाॅ. बाबा आढाव यांच्या हस्ते हा पुरस्कार मला दिला जाणार आहे.पुरस्कार जाहीर झाल्याचा फोन आला आणि डोळ्यांत पाणी तरळलं. वाटलं, मी एवढ्या मोठ्या सन्मानासाठी पात्र आहे का? बर्‍याचजणांना हे ही वाटेल की याचं काय एवढं मोठं काम? आंबेडकर कुटूंबीय आणि पुरस्कार समितीनं असं काय पाहिलं असावं माझ्यात? फुले आंबेडकर जयंतीवेळी गांवोगांवी जाऊन व्याख्यानं देणं… बुद्ध जयंती-तुकाराम बीजेचं वगैरे निमित्त साधुन बुद्ध-तुकाराम यांच्यातल्या संबंधांवर गांवखेड्यातल्या बुद्धविहारात जाउन भाषणं देणं… हे सगळं शुटिंगमधून वेळ मिळेल तसं. इतरवेळी अधूनमधून फेसबुक पोस्टमधून शिव-शाहू-फुले-आंबेडकरी आणि तुकोबांच्या विचारांचा प्रसार करणं… यापलीकडं फार मोठ्ठं योगदान नाही माझं’.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

पुढे, ‘दुसरं म्हणजे हे सगळं मी कुठल्या मानसन्मानासाठी नाही करत. माझा आनंद आहे यात. मला अभिनयातून जेवढं समाधान मिळतं तेवढंच या गोष्टींतूनही मिळतं. हे सगळं मी ‘स्वान्तसुखाय’ करतो. याची दखल थेट आंबेडकर कुटूंबियांनी घेणं हे माझ्या काळजाला स्पर्श करून गेलंय. कदाचित माणसामाणसात फूट पाडू पहाणार्‍या आजच्या भवतालात, रंगमंचावर-पडद्यावर विविध भुमिका साकारणार्‍या एका अभिनेत्यानं, सामाजिक ‘भुमिका घेणं’ हे त्यांना महत्त्वाचं वाटलं असावं. केवळ त्या भावनेचा आदर म्हणून मी हा पुरस्कार स्विकारणार आहे. मी लहान असताना माझे वडील मला डाॅ.बाबा आढावांची भाषणं ऐकायला मायणीहून सातारला घेऊन जायचे. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार मला मिळणार आहे, हे माझ्यासाठी किती मोलाचं आहे ते मी शब्दांत नाही सांगू शकत. आत्ता हे लिहीतानाही हात थरथरताहेत. माझ्यावर मोलाचे संस्कार करणार्‍या डाॅ. आ. ह. साळुंखे तात्यांचा माझ्या जडणघडणीत अतिशय मोलाचा वाटा आहे. सगळं श्रेय त्यांचं आहे. मी निमित्तमात्र. धन्यवाद बाळासाहेब… धन्यवाद पुरस्कार समिती. जयभीम’.

Tags: Instagram PostKiran Manemarathi actorviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group