हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकीकडे ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावरून वाद सुरु आहेत. त्यातच आता भरीस भर म्हणून टिपू सुलतानची एन्ट्री झाली आहे. होय. नुकतेच सोशल मीडियावर ‘टिपू’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टमध्ये टिपू यांच्या चेहऱ्यावर काळे फासलेले दिसत आहे. या प्रकारामुळे सध्या चांगलेच वातावरण तापले आहे आणि परिणामी येत्या काळात आणखी एका मोठ्या वादाला तोंड फुटणार असे स्पष्ट दिसत आहे.
Producers Sandeep Singh and Rashmi Sharma launched the poster of #Tipu .
Directed by Pawan Sharma, researched and developed by Rajat Sethi. Presented by Eros International and Rashmi Sharma Films, produced by Sandeep Singh and Rashmi Sharma.@thisissandeeps@sharmarashmi20… pic.twitter.com/jVdIrh94Ce
— Sumit Kadel (@SumitkadeI) May 4, 2023
नुकतेच ‘टिपू’ या आगामी चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. टिपू सुलतानबद्दल आजवर आपण इतिहासात जे शिकलो त्याच्या उलट प्रतिमा दर्शवणारे चित्र यात आपल्याला पहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये टिपू सुलतानने उध्वस्त केलेली मंदिरे दाखवली आहेत, लोकांचे जबरदस्ती धर्मांतरण केले, अनेक लोकांवर अन्याय केल्याचे या मोशन पोस्टरमध्ये दाखवले आहे. तसेच या पोस्टरशेवटी येणाऱ्या टिपू सुलतान यांच्या प्रतिमेच्या चेहऱ्यावर आपल्याला काळे फासल्याचे बघायला मिळत आहे.
Mujhe yaad hai lockdown pe jo movie aayi thi usko tumne propaganda film kaha tha ab esko kya kahoge? Jo nufrat failane ke liye ho usko art nahi keh sakte..
— Khalil Pathan (@khalilpathan) May 4, 2023
यावरून सहज लक्षात येते कि, इतिहासात टिपू सुलतानबद्दल जे मांडले गेले आहे त्याच्या विरुद्ध इतिहास आपल्याला या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पहायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी भाजपाचे ईशान्य भारतातील मणिपुरच्या मुख्यमंत्र्यांचे सल्लागार, प्रसिद्ध लेखक आणि सूत्रसंचालक रजत सेठी यांनी संशोधन केले आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन पवन शर्मा यांनी केले आहे.
Yechutiyappa band karo, he is our pride, he is our freedom fighter, he is not like Bhakt and gulam.
— Citizen Of India🇮🇳 (@Tips5500) May 5, 2023
चित्रपटाबाबत बोलताना पवन म्हणाले कि, ‘आपल्याला आजवर पाठ्यपुस्तकातून टिपू सुलतानबद्दल सगळी चुकीची माहिती देण्यात आली आहे. जेव्हा टिपूबद्दल काही भयानक गोष्टी माझ्यासमोर आल्या तेव्हा मला खूप मोठा धक्काच बसला. या चित्रपटाच्या माध्यमातून ते भयावह सत्य उघडकीस आणणार आहे, जे इतक्या दिवसांपासून आपल्यापासून लपवून ठेवण्यात आले होते.
Nice strategy for upcoming Karnataka Elections which BJP was going to lose.
— مرزا شانے حیدر 🇮🇳 (@thisisMSH) May 4, 2023
टिपू हा त्याच्या वडिलांपेक्षा क्रूर होता. तो त्या काळातील हिटलरच होता’. रश्मि शर्मा आणि संदीप सिंह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून हा चित्रपट हिंदीसह कन्नड, तमिळ, तेलुगू अन् मल्याळम् भाषेत प्रदर्शित होणार आहे.
Discussion about this post