हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट उत्तर प्रदेश सरकारने राज्यभारत टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची घोषणा स्वतः योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी केली. एकीकडे या चित्रपटावरून सर्वत्र वाद उफाळताना दिसतोय तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात हा चित्रपट टॅक्स फ्री करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाने सांगितलं की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह लोक भवन येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष स्क्रीनिंगसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
'The Kerala Story' उत्तर प्रदेश में टैक्स फ्री की जाएगी।
— Yogi Adityanath (@myogiadityanath) May 9, 2023
‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट लव जिहाद या विषयावर भाष्य करतो आहे आणि त्यामुळे या चित्रपटातून लव जिहादच्या जाळ्यात अडकलेल्या मुलींचे आयुष्य कसे उध्वस्त होते..? हे पहायला मिळत आहे. याशिवाय चित्रपटातून दहशतवादाच्या रचनेचा पर्दाफाश केला गेला आहे, असे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी म्हटले आहे.
यानंतर आता उत्तर प्रदेशात हा सिनेमा टॅक्स फ्री केल्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षक हा सिनेमा पाहतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर महाराष्ट्रातसुद्धा ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला समर्थन दिले जात आहे. मुंबई, पुणे सारख्या शहरांमध्ये या चित्रपटाच्या समर्थनार्थ पोस्टरबाजी केली जात आहे.
#TheKerlaStory पर विवाद गहराता जा रहा है! कोई बैन कर रहा है तो कोई प्रमोट कर रहा है!
अब उत्तर प्रदेश में योगी सरकार ने भी इसे टैक्स फ्री कर दिया है!फिल्म की स्पेशल स्क्रीनिंग की जाएगी। स्पेशल स्क्रीनिंग में सीएम योगी आदित्यनाथ @myogiadityanath और उनका मंत्रिमंडल भी रहेगा…
— takshu Jain (@takshubjp) May 9, 2023
अलीकडेच पुण्याच्या भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन या चित्रपटाच्या समर्थनार्थ काही बॅनर लावले होते. या संघटनांनी नागरिकांना ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहण्याचे आवाहन देखील केले आहे. ‘एकवेळ आपल्या मुलींना केरळ दाखवू नका.. पण ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट जरूर दाखवा’ असे संदेश लिहिलेले बॅनर ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. तर देशातील काही ठिकाणी ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे. इतकेच काय तर तमिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आल्याचे चित्र दिसत आहे.
Discussion about this post