Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

लेकीच्या वाढदिवशी किरण माने झाले भावुक; पोस्ट शेअर करत म्हणाले, ‘तू माझ्या आयुष्यात…’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Kiran Mane With Daughter
0
SHARES
95
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आईची मुलांसोबत नाळ जोडली असली तरी बापासोबत मुलांचं नातं काही औरच असतं. जगापुढे डोंगरासारखा उभा राहून मुलांना सक्षमपाने घडविणारा बाप मनाने मात्र हळवाच असतो. बाप लेकीचं नातं हे अतिशय हळवं नातं असतं. लेकीपुढे बापाला भावना दडवता येत नाहीत हेच खरं. असाच एक भावनिक प्रसंग शेअर करत किरण मानेंनी लेकीसाठी पोस्ट लिहिली आहे. आज किरण माने यांची लेक ईशाचा वाढदिवस आहे आणि या निमित्त त्यांनी हि पोस्ट शेअर केली आहे. किरण माने यामी लिहिलंय कि, ‘तो दिवस अजून आठवतोय. स्कूटरवरून माझ्या इंजिन ऑईलच्या दुकानात जाता- जाता हाॅस्पीटलमध्ये थांबलो. माझी एक दिवसाची छोटी छकुली हातात घेतली… गोड हसली माझ्याकडं बघून… मनात विचार आला ही मोठी झाल्यावर तुझे बाबा काय करतात? या प्रश्नाचं काय उत्तर देईल?

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

पुढेलिहिलंय, ‘म्हणेल, ते दुकानदार आहेत. ऑईल, स्पेअरपार्टस् विकतात. माझ्या अंगावर सर्रर्रर्रकन काटा आला! म्हन्लं नाय नाय नाय नाय… मला ही ओळख नको. माझी पॅशन, माझा श्वास, माझ्या रक्तात ‘अभिनय’ आहे. कितीही संकटं येऊदेत. काहीही होऊदेत. जग इकडचं तिकडं होऊदेत. मला अभिनय करत रहाण्याचा आनंद घ्यायचाय. माझ्या पोरीनं कधीही अभिमानानं सांगीतलं पायजे माझे बाबा ॲक्टर आहेत. अस्वस्थ झालो… सैरभैर अवस्थेत स्कूटर काढली… स्कूटर तिरकी करून दहा किका मारल्याशिवाय स्टार्ट होत नव्हती… विचारात असल्यामुळं किक मारताना पाय सटकून नडगीवर दणका बसला…खण्ण्णकन. मेंदूत कळ गेली. पण दुर्लक्ष केलं. कारण त्यापेक्षा काळजातली उलघाल जास्त जीवघेणी होती. दुकानात येऊन बसलो. मनात तेच विचार… मला अभिनेता म्हणून जगायचंय… ही दुकानदारी, ही हिशोबाची वही, हा गल्ला, हे माझं जग नाही. सगळ्या ऑईलच्या कॅन्समध्ये मी गुदमरून चाललोय असा भास व्हायला लागला… त्याचदिवशी मी पेपरात जाहिरात बघितली : ‘पं. सत्यदेव दूबे यांची पुण्यात अभिनय कार्यशाळा’

View this post on Instagram

A post shared by Eesha Mane (@eesha_mane)

‘तो किस्सा मी यापूर्वी पोस्टमधून लिहीलाय. खूप व्हायरल ही झालाय. पण त्या आधीची ही गोष्ट खूप कमी लोकांना माहीतीये. तर मी दुकानाचं शटर ओढलं आणि दूबेजींकडे जाऊन अभिनयाचा ध्यास घेतला. बेभरवशाचं क्षेत्र निवडल्यामुळं लै ओढाताण झाली. पैशाची कायम चणचण. घरातलं टेन्शन तर स्ट्रगलर्सच्या पाचवीला पुजलेलं. रोजचे खर्च भागवणं मुश्कील असायचं. पण कुणी विचारल्यावर लहानगी ईशा जेव्हा बोबड्या पण खणखणीत आवाजात सांगायची ना, माजे बाबा ॲक्टल आहेत तेव्हा लै लै लै भारी वाटायचं मला. सगळा ताण निवळून जायचा’. आज तिला बघितलं की लोक म्हणतात, ही ईशा… ॲक्टर किरण मानेंची मुलगी. ईशाला ते रोजचं सवयीचं झालंय… पण मी जेव्हा- जेव्हा ऐकतो, तेव्हा मी आतून खूप सुखावतो. वाढदिवसाच्या मनभरून शुभेच्छा ईशा… तू माझ्या आयुष्यात बहार घेऊन आलीयेस… तुला आयुष्यात जे पायजे ते भरभरून मिळो… खूप आनंदी रहा, हसतमुख रहा… तुझ्या प्रत्येक निर्णयात तुझा बाप पहाडासारखा तूझ्या पाठीशी उभा राहिल. लब्यू.- तुझा बाबा’

Tags: Birthday Special PostFather-Daughter RelationInstagram PostKiran Maneviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group