हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। विविध विषयांवरील विविध चित्रपट, सिरीज हे नेहमीच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असतात. अनेकदा काही चित्रपट हे खऱ्या घटनांवर आधारित असतात. असेच एक खरे खुरे कथानक रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होऊ घातले आहे. अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या जेलमध्ये असणाऱ्या आसाराम बापु प्रकरणाने देशभरात खळबळ माजवली होती. याच प्रकरणावर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे नाव ‘सिर्फ एक बंदा काफी है’ असे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे.
यामध्ये आसाराम बापुच्या विरोधात कोर्टात शेवटपर्यंत लढणाऱ्या वकिलाची भूमिका अभिनेता मनोज वाजपेयीने साकारली आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अपूर्व सिंग कतरी यांनी केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला या चित्रपटाचा त्तरेलार सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे. आतापर्यत नेटकऱ्यांचा या ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. मुख्य म्हणजे हा ट्रेलर पाहून गुगलवर ज्या व्यक्तीने आसाराम बापूच्या विरोधात कोर्टात लढा दिला त्याच्याविषयी सर्च केले जात आहे.
हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. मनोज साकारत असलेली भूमिका हि राजस्थान सेशन कोर्टात प्रॅक्टिस करणाऱ्या पूनम चंद्र सोलंकी यांची आहे. प्रसिद्ध वकील राम जेठमलानी, सलमान खुर्शीद आणि सुब्रमण्यम स्वामींसारख्यांची बोलती त्यांनी बंद केली होती. वकील पुनम चंद्र ही व्यक्तिरेखा चित्रपटातील केंद्रबिंदू आहे कारण आसाराम बापूला झालेली अटक ते तुरुंगवास यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती. दरम्यान त्यांना कोट्यवधी रुपयांचे आमिष देऊनही त्यांनी न्यायाची आणि सत्याची साथ सोडली नाही. त्यामुळे हा चित्रपट सर्वांचे लक्ष वेधून घेणार इतके नक्की.
Discussion about this post