हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकेकाळी बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डीने सिनेसृष्टीवर आपल्या अभिनयाने छाप पाडली होती. मात्र गेल्या काही काळापासून तिचा लाईमलाईटसोबत फार कमीच संबंध आला आहे. समिराने मोजकेच सिनेमे केले असले तरी तिची फॅन फॉलोईंग मात्र मोठी आहे. तसं तर बॉलीवूड अभिनेत्रींकडे बोल्डनेस आणि फिटनेससाठी पाहिलं जातं. मात्र समीराचा याच्याशी काहीही संबंध नाही. कारण आई झाल्यानंतर तीच वाढलेलं वजन तिला लाजवत नाही तर आनंद देत. हाच आनंद व्यक्त करत तिने मदर्स डेचे निमित्त साधून एक नवं फोटोशूट शेअर केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी ही दोन मुलांची आई आहे आणि गर्भारपणानंतर तीचं वजन फार वाढलं आहे. असे असले तरीही या वाढलेल्या वजनामुळे तिचा आत्मविश्वास कधीच कमी झाला नाही. कारण या वाढलेल्या वजनाचे तिने कधीच दुःख व्यक्त केले नाही. सध्या मदर्स डे वीक चालू असल्यामुळे समीराने एक हटके फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिचं वाढलेलं वजन स्पष्ट दिसून येत आहे. पण वजनापेक्षा तिच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आत्मविश्वास लक्ष वेधून घेत आहे. समिराचे ‘मेसी मम्मी..’ अंतर्गत पोस्ट केलेले व्हिडीओ नेहमीच भारी असतात. कधी सासूसोबत तर कधी तिच्या मुलांसोबत ती अनेकदा रील शेअर करते.
यावेळी तिने मदर्स डे निमित्त केलेलं फोटोशूट पाहिलं तर समजेल कि ती बिनधास्त आपलं वाढलेलं वजन दर्शवित आहे. या फोटोत तिने कुठेही स्वतःच पोट किंवा सुटलेलं अंग झाकण्याचा प्रयत्न केलेला नाही. तिने हे फोटो शेअर करत सर्व मातांना ‘आपल्या वाढलेल्या वजनाचं टेन्शन न घेता आईपण सेलिब्रेट करा’, असा सल्ला दिला आहे. या व्हिडीओसोबत तिने म्हटले आहे कि, ‘माझं वाढलेलं वजन मी एन्जॉय करते…मला आजही मी सेक्सी दिसते..माझं शरीर बदललं तसा माझा अॅटिट्युडही’. समीरचा हा बिनधास्त अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे.
Discussion about this post