हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हि मालिका गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मात्र गेल्या काही काळापासून या मालिकेतील जुने कलाकार मालिकेला रामराम ठोकताना दिसत आहेत. इतकेच नव्हे तर मालिकेच्या निर्मात्याबाबत विविध गोष्टी समोर येत आहेत. अलीकडेच या मालिकेत रोशन सोढी हि भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यांनी आपला लैंगिक छळ केल्याचे म्हटले होते आणि या खुलास्याने सगळ्यांनाच धक्का बसला होता. यानंतर आता जेनिफरने प्रोजेक्ट मॅनेजर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आणि मेकर्सवर लैंगिक छळाचा आरोप करत पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे शो मेकरच्या अडचणीत चांगल्याच वाढल्या आहेत.
अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने शोच्या निर्मात्यांवर लैंगिक छळाचा आरोप करत लेखी तक्रार दाखल केली आहे. असे असले तरीही माहितीनुसार, अजून FIR नोंदवण्यात आलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून लवकरच या प्रकरणाशी संबंधित लोकांचे जबाब नोंदवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. अभिनेत्री जेनिफरने असित मोदी व्यतिरिक्त सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्यावरही गैरवर्तनाचे आरोप केले आहेत. याप्रकरणी डीसीपी झोन १० यांच्याकडे तिने लेखी तक्रार दिली आहे. याशिवाय सोशल मीडियावर तिने या प्रकरणावर बोलतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. जो चांगलाच व्हायरल होतो आहे.
या प्रकरणावर बोलताना ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेचे निर्माते असित मोदी आणि त्यांच्या टिमने अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालचे सर्व आरोप फेटाळुन लावले आहेत. इतकेच नव्हे तर याप्रकरणी कायदेशीर कारवाईने जबाब देऊ, असेही असित मोदी यांच्या टीमचे म्हणणे आहे. मात्र या सर्व प्रकरणाचा परिणाम ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेच्या टीआरपीवर होताना दिसतो आहे. कारण अभिनेत्रींच्या आरोपानंतर पुन्हा शोच्या निर्मात्यांनी तिच्या वागण्यावर आणि काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. यामुळे हि चालू चिखलफेक अन याआधी काम सोडलेल्या कळकरांनी केलेल्या तक्रारी पाहता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असल्याचे म्हटले जात आहे.
Discussion about this post