Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘माझी आई सातवी पास आहे..’; ‘मदर्स डे’निमित्त हेमांगीने शेअर केलेली पोस्ट चर्चेत

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Hemangi Kavi
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज मदर्स डेनिमित्त जगातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आईसाठी हा दिवस खास करू पाहत असेल. खरंतर आईसाठी एखादा दिवस खास काय साजरा करायचा..? जिच्यामुळे आपण रोजचा नवा दिवस पाहू शकत आहोत तिला एकाच दिवशी स्पेशल काय फील करून द्यायचं..? असं असलं तरीही दगदगीच्या आयुष्यात हा एक दिवस का होईना फक्त आईला वेळ द्यायला हरकत काय आहे… नाही का? म्हणूनच आजचा दिवस हा खास आहे. या दिवसाचे औचित्य साधून मनोरंजन विश्वातील कलाकार मंडळी देखील आईसाठी खास पोस्ट शेअर करत आहेत. ज्यामध्ये हेमांगी कवीचाही समावेश आहे. तिने आपल्या आईसाठी लिहिलेली हि पोस्ट व्हायरल झाली आहे.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीने आईसोबतचा फोटो पोस्ट करून लिहिलंय की, ‘Mummy! जगातली सुंदर स्त्री! प्रत्येकाला असं वाटतं पण माझी आई खरंच सुंदर आहे. तिच्यासारखं ५०% सौंदर्य मला मिळालं असतं तर? पण आपण पडलो पितृमुखी! म्हटलं सौंदर्य नाही तर नाही बाकी गुण तरी घेऊयात. काही गुण अनुवंशिक आलेत काही अथक प्रयत्नांनी आणलेत. तरी ही तुझी सर नाहीच. तुझ्यासारखा त्याग, परिवारासाठी असलेली माया, प्रेम, पप्पांना डोळे झाकून दिलेली साथ, संसारात घेतलेले कष्ट, संपाच्या काळात दाखवलेला संयम, घरात किती भांडणे झाली तरी पाहुणे, नातेवाईक घरी आले की जणू काही झालंच नाही म्हणून केलेलं त्याचं स्वागत, घरात किती ही माणसं आली तरी त्यांच्यासाठी केलेला स्वंयपाक, महीना आखिरीला पैसे नसले तरी तुझं खंबीर असणं’.

View this post on Instagram

A post shared by Hemangi Kavi-Dhumal (@hemangiikavi)

हेमांगीने पुढे लिहिलंय कि, ‘प्रत्येक परिस्थितीला हसत मुखाने सामोरी जाणं, व्यवहारज्ञान, तल्लख बुद्धी (माझी आई सातवी पास आहे त्यावेळचं ते मॅट्रिक पास समजलं जायचं आणि नोकरीची offer ही आली होती), हजरजबाबीपणा, माणसांना ओळखण्याचं कसब! प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात पण तुझ्याबाबतीतले चढ- उतार बघता मला कायम प्रश्न पडतो आणि कुतूहल वाटतं की कसं कसं निभावून नेतेस..? आताही! प्रत्येक जन्म तुझ्या पोटी यावा हीच ईच्छा!’. अशी पोस्ट शेअर करत हेमांगीने आईसाठी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

Tags: Hemangi KaviInstagram PostMarathi Actressviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group