हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या शनिवारी १३ मे २०२३ रोजी बहुचर्चित कपल बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टी’चे खासदार राघव चड्ढा यांचा भव्य स्वरूपात शाही साखरपुडा सोहळा संपन्न झाला. नवी दिल्लीतील कपुरथला हाऊसमध्ये राघव आणि परिणीती यांच्या नात्याची एक गोड सुरुवात झाली आहे. एकमेकांना अंगठी घालत निकटवर्तीय मंडळींच्या उपस्थितीत त्यांनी आपल्या नात्याची अधिकृत घोषणा केली आहे. मी कोणत्याही राजकारण्यासोबत लग्न करणार नाही म्हणणारी परिणीती शेवटी खासदार राघव चड्ढा यांच्या प्रेमात पडली. त्यांच्या साखरपुड्याची धामधूम सर्वत्र पसरली असताना परिणीतीची आई मात्र फार भावुक झाली आहे.
अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. सोशल मीडियावर त्यांच्या साखरपुड्याची फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. जे पाहून नेटकरी, चाहते, राजकीय मंडळी, कलाकार मंडळींनी या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. दरम्यान परिणीतीची आई ‘रीना चोप्रा’ यांनीदेखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या लेकीच्या आयुष्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाच्या क्षणी आई म्हणून त्या भावुक झाल्या आहेत. म्हणूनच व्यक्त होण्यासाठी त्यांनी लेक आणि जावयासाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
परिणीतीच्या आईने साखरपुडा सोहळ्यातील अनेक फोटो सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. ज्यामध्ये राघव- परिणीतीच्या आनंदात संपूर्ण चोप्रा कुटुंबीय आनंदी असल्याचे दिसून आले. यातच परिणीती आणि राघव यांचा एक फोटो शेअर करीत रीना चोप्रा यांनी लिहिलंय कि, ‘तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की, ‘देव’ आहे यावर तुमचा विश्वास बसतो. आमच्या आयुष्यात आलेला हा सुंदर प्रसंग त्याचेच एक उदाहरण आहे… यासाठी मी देवाचे मनापासून आभार मानते. तसेच तुम्ही सर्वांनी दिलेल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद यासाठी मन:पूर्वक धन्यवाद!’
Discussion about this post