Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘प्रेम- विवाह, भांडण आणि घटस्फोट’; विकी- साराचा ‘जरा हटके, जरा बचके’ करणार मनोरंजनाची हद्द पार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 16, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Zara Hatke Zara Bachke
0
SHARES
578
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमध्ये लवकरच कमाल आणि धमाल करायला प्रसिद्ध अभिनेत्री सारा अली खानसोबत अभिनेता विकी कौशल सज्ज झाले आहेत. एक नवी कोरी जोडी आणि नवी कोरी स्टोरी घेऊन सारा आणि विकी फुल्ल एंटरटेनमेंट करणार आहेत. नुकताच विकी आणि साराच्या ‘जरा हटके जरा बचक’ या आगामी धमाकेदार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल होताच प्रेक्षकांनीदेखील या ट्रेलरला तुफान पसंती दर्शवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर विकी कौशल आणि सारा अली खान दोघांनीही आपल्या आगामी चित्रपटाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोन कुटुंबांची जबरदस्त स्टोरी आहे. जी एका सर्वसामान्य जोडप्याच्या जीवनावर आधारलेली आहे. या चित्रपटात प्रेम, भांडण, इमोशन, ड्रामा सगळं काही आहे. त्यामुळे एकंदरच ‘जरा हटके जरा बचके’ म्हणत हा सिनेमा टोटल मनोरंजन करणार आहे. सोशल मीडियावर या सिनेमाचा ट्रेलर जबरदस्त व्हायरल होत आहे. हा चित्रपट येत्या २ जून २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे आणि या नव्या जोडीबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

View this post on Instagram

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09)

या सिनेमामध्ये पहिल्यांदाच अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल यांची जोडी आपल्या भेटीला येत आहे. त्यामुळे दोघांच्या केमिस्ट्रीबाबत मोठी चर्चा सुरु आहे. अनेकांनी हा ट्रेलर पाहिल्यानंतर दोघांच्या केमिस्ट्री आणि फॅन फॉलोईंग पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालेल अशी अपेक्षा दर्शवली आहे. गेल्या काही काळापासून सारा अली खानच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी प्रतिसाद न दिल्याने तिचे चित्रपट सपशेल तोंडावर पडताना दिसले आहेत. तर विकी कौशल सध्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसायच्या तयारीत आहे.

Tags: Bollywood Upcoming MovieInstagram PostSara Ali KhanVicky KaushalViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group