हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू ही ससोहळ मीडियावर प्रचंड सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहताना दिसते. तिचा चाहतावर्ग प्रत्येक वयोगटात आहे आणि फार मोठा आहे. त्यामुळे रिंकूने शेअर केलेली प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसते. शिवाय रिंकू स्वतःच आपल्या आयुष्यातील महत्वाच्या घडामोडी आवर्जून चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. आताही तिने असाच एक व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
अभिनेत्री रिंकू राजगुरूला तुम्ही हटके अंदाजात अनेकदा बुलेटवर किंवा ट्रॅक्टरवर पाहिले असेल. पण यावेळी रिंकू फॉर व्हीलर चालवताना दिसली आहे. मुख्य म्हणजे तिने साडी नेसून, शृंगार करून, पारंपरिक दागिने परिधान करून गाडी चालवली आहे. यावेळी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद, उत्साह आणि मुख्य म्हणजे आत्मविश्वास झळकत होता. या व्हिडिओमध्ये ती अत्यंत उत्कृष्टरित्या कार चालवताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत रिंकूने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘डेस्टिनेशन न ठरवताच लॉंग ड्राइव्हला जाऊया’.
रिंकूचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शिवाय तिचा पारंपरिक पेहरावात गाडी चालवण्याचा अंदाज तिच्या नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट करत तिचे कौतुक केले आहे. या व्हिडीओवर कमेंट करताना एका नेटकऱ्याने लिहिले आहे कि, ‘बुलेट, ट्रॅक्टर, कार…आता फक्त विमान चालवायचं राहिलंय’. तर आणखी एकाने तिला ‘अकलूजची राणी’ म्हटले आहे.
Discussion about this post