Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘मी वाहतुकीचे नियम मोडले नाही’; विना हेल्मेट बाईक राईडचा फोटो व्हायरल झाल्यानंतर बिग बींनी दिले स्पष्टीकरण

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 17, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, ब्लॉग, सेलेब्रिटी
Amitabh Bachchan
0
SHARES
86
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या विना हेल्मेट बाईक राईडचा फोटो सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी अमिताभ बच्चन यांचा चांगलाच क्लास घेतल्याचे दिसले. अमिताभ बच्चन यांनी चित्रपटाच्या शूटिंगला वेळेत पोहोचण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीकडे लिफ्ट मागितली होती आणि यासंदर्भात त्यांनी इंस्टावर पोस्ट शेअर करीत त्या व्यक्तीचे आभार मानले होते. मात्र बाईक वरून प्रवास करताना त्यांनी हेल्मेट न घातल्याने नेटकऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर आता स्वतः अमिताभ यांनी स्पष्टीकरण दिले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Amitabh Bachchan (@amitabhbachchan)

बाईक राईड करताना हेल्मेट का नव्हते घातले याबाबत स्पष्टीकरण देताना अमिताभ बच्चन ब्लॉग शेअर करत लिहिले आहे कि, ‘माझ्या बाईक राईडचे फोटो पाहून सोशल मीडियावर अनेक घडामोडी घडत आहेत. बलार्ड स्ट्रीटवर चित्रीकरण करण्यासाठी आम्ही रविवारचा दिवस पाहून रितसर परवानगी घेतली होती. शूटिंगच्या परिसरात केवळ ३० ते ४० लोक होते. जो फोटो मी पोस्ट केला होता त्यात मी एका क्रू मेंबरच्या बाईकवर बसलो होतो आणि कपडे सुद्धा शूटिंगदरम्यानचे आहेत. या बाईकने मी कुठेही प्रवास न करता केवळ प्रवासासाठी तुमचा वेळ बाईकमुळे कसा वाचू शकतो याबाबत माहिती दिली आहे’.

पुढे लिहिलंय, ‘समजा एखाद्या ठिकाणी वेळेत पोहोचायचे असेल, तर मी प्रवास करताना हेल्मेट घालून वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करुन बाईकने प्रवास करेन. वेळ वाचवण्यासाठी असा प्रवास करणारा मी एकटा नसून याआधी अक्षय कुमारने सुद्धा सेटवर वेळेत पोहोचण्यासाठी बाईकची मदत घेतली होती. माझी एवढी चिंता, काळजी आणि मला ट्रोल केल्याबद्दल आभार… मी वाहतुकीचे कोणतेही नियम मोडले नाहीत. गैरसमज करुन घेऊ नका मी तसे काहीही केले नाही. तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप प्रेम…’

Tags: Amitabh BachchanBlog PostInstagram PostSocial Media TrollingViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group