Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘महाराष्ट्र शाहीर’ येणार OTT’वर भेटीला; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा पहाल?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
May 31, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maharashtra Shahir
0
SHARES
878
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा मराठी सिनेसृष्टीचा एक वेगळा पैलू उलघडणारी कलाकृती ठरलेला चित्रपट आहे. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातून महाराष्ट्राच्या मातीतील कलाकार लोकशाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला आणि आणि म्हणून हा चित्रपट अत्यंत खास ठरला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवला. दरम्यान बरेच प्रेक्षक थिएटरमध्ये हा चित्रपट पाहू शकले नाहीत. त्यांना या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची प्रतीक्षा होती. अखेर हि प्रतीक्षा आता संपणार आहे.

केवळ महाराष्ट्रात नव्हे तर परदेशातही ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाचा डंका वाजला. या चित्रपटातील गाण्यांनी तर देश विदेश गाजवले. ज्यांना मराठी भाषासुद्धा कळत नाही ते या गाण्यावर थिरकले. कलाकार, मान्यवर, समीक्षक सगळ्यांनीच या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत त्याला डोक्यावर उचलून घेतले. या चित्रपटात शाहिरांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी आणि शाहिरांच्या पत्नी भानुमती साबळे यांच्या भूमिकेत सना शिंदे दिसली. आता शाहिरांचा डफ ओटीटीवर कडाडायला सज्ज झाला आहे.

View this post on Instagram

A post shared by महाराष्ट्र शाहीर Maharashtra Shaheer (@maharashtra_shaheer_the_film)

या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार दिसले आहेत. शुभांगी सदावर्ते, निर्मिती सावंत, अतुल काळे हे कलाकार देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसले आहेत. आता या चित्रपटाची ओटीटी रिलीजची प्रतीक्षा संपली आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट लवकरच ओटीटीवर येणार आहे आणि याबाबत केदार शिंदे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट येत्या २ जून २०२३ रोजी ऍमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता घरबसल्या शाहिरांची भेट होणार आहे.

Tags: Amazon Prime VideoInstagram PostMaharashtra ShahirOfficial TrailerOTT ReleaseViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group