हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाने बॉक्स ऑफिस अक्षरशः गाजवला आहे. या सिनेमाने प्रेक्षक, समीक्षकांचे मन जिंकले. शिवाय बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने तुफान कमाई केली आहे. अजूनही हा सिनेमा थिएटरमध्ये कमाल दाखवत आहे. या सिनेमाला विविध स्तरांवरून विरोध झाला. मात्र तरीही सिनेमा गाजला आणि अजूनही गाजतो आहे. तब्बल २०० कोटींच्या वर मजल मारणाऱ्या या सिनेमामध्ये एक ज्वलंत कथा तगड्या कलाकारांनी अतिशय दमदार पद्धतीने सादर केली आहे. या सिनेमात अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आणि तिने या सिनेमाच्या शुटिंगदरम्यानचा अनुभव शेअर केला आहे.
‘द केरला स्टोरी’ या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामद्ये अदाने ‘द केरला स्टोरी’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये अदाचा चेहरा पूर्ण सुकलेला, भेगाळलेला आणि मुख्य म्हणजे खूप जखमांनी भरलेला दिसतो आहे. या फोटोंसोबत तिने लिहिलंय कि, ‘#The Kerala Story मधून, नंतर आणि आधी Sunkissed. अशा फाटलेल्या ओठांचे रहस्य… ४० तास उणे 16 डिग्री तापमानात स्वतःला डिहायड्रेट ठेवलं. याशिवाय पडण्याच्या सरावासाठी मागे गादी ठेवली होती पण आम्ही त्याचा वापर केला नाही # सोलपटलेले गुडघे आणि कोपर.. उफ्फ हे सर्व खूप मोलाचे आहे.. शेवटचा फोटो केसांमध्ये मुठभर खोबरेल तेल, सेफ्टी पिन आणि घट्ट वेण्या’.
अदाच्या या फोटोंमधील तिची अवस्था पाहून शूटिंग दरम्यान खरंच तिचे काय हाल झाले असतील याचा अंदाज लावता येत आहे. ‘द केरला स्टोरी’ या सिनेमातून केरळमधून गायब झालेल्या ३२ हजार मुलींचं भयावह सत्य आणि त्या प्रकारामागील धक्कातंत्र दर्शविण्यात आले आहे, या सिनेमातून दहशतवादाची पार्श्वभूमी, जबरदस्तीचे धर्मांतर आणि दहशतवादी संघटनांचे पसरलेले जाळे असे विषय अत्यंत स्पष्टपणे मांडण्यात आले आहे. सिनेमात अनेक नकारात्मक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. मात्र तरीही सिनेमाचं यश पाहण्याजोगे आहे. मुख्य म्हणजे या सिनेमाचा सिक्वल येणार असल्याचे बोलले जात आहे. निर्माते विपुल शाह यांनी म्हटले आहे कि, ‘या सिनेमाची कथा अजून संपलेली नाही.. अजून बरंच काही सांगायचं आहे. यावेळी आम्ही ते नक्कीच समोर आणायचा प्रयत्न करू. तुम्ही काळजी करू नका’. त्यामुळे आता प्रतीक्षा आहे ती ‘द केरला स्टोरी २’ या सिनेमाची.
Discussion about this post