हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। एकेकाळी टीव्हीवर प्रचंड पाहिली जाणारी अत्यंत लोकप्रिय मालिका ‘रामायण’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. हि मालिका बनवणाऱ्या रामानंद सागर यांची पणती आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. तिचं नाव साक्षी चोप्रा असे आहे आणि सोशल मीडियावर ती तिच्या विचित्र ड्रेसिंग स्टाईलमुळे चर्चेत आली आहे. नेटकऱ्यांनी तिचा विचित्र ड्रेस पाहताच उर्फी जावेदची आठवण काढली आहे. सोशल मीडियावर तिचा हा आऊटफिट नेटकऱ्यांकडून ट्रोल केला जात आहे.
‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर यांची पणती साक्षी चोप्रा हि एक सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर आहे. रामानंद सागर यांचा मुलगा मोती सागर यांची मुलगी मीनाक्षी हिची ती मुलगी आहे. तशी ती नेहमीच बोल्ड अवतारात स्पॉट होते. पण यावेळी तिने परिधान केलेले कपडे पाहून नेटकऱ्यांनी तिचा क्लास घेतला आहे. अनेकांनी तिच्या आऊटफिटवर टीका करताना उर्फीची आठवण काढली आहे. साक्षीचे अनेक फोटो तसेच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच तिचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये तिने नेटचा ड्रेस परिधान केला आहे. जो विरल भयानीने शेअर केलाय. या लूकसाठी तिने पोनीटेल हेअर स्टाईल आणि हाय हिल्स परिधान केले आहेत.
साक्षीच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट करत तिला ट्रोल केले आहे. एकाने म्हटले आहे कि, ‘ही उर्फीची बहीण कुल्फी आहे’. तर आणखी एकाने म्हटले कि, ‘सर्वांना उर्फी बनायचंय’. तसेच आणखी एका नेटकऱ्याने लिहिलंय, ‘उर्फीशी स्पर्धा करायला नवं कार्टून आलंय मार्केटमध्ये’. तर अन्य एका युजरने लिहिले, ‘एक उर्फी सहन होत नाही, आता दुसरी आली’. आणखी एका नेटकऱ्याने कमेंटमध्ये लिहिलंय, ‘हा ड्रेस हिच्या आधी उर्फीने घातला होता.
Discussion about this post