हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ओम राऊतचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा अगदी घोषणेपासूनच चर्चेत आहे. त्यानंतर टिझर, ट्रेलर, गाण्यांनी तर सोशल मीडिया अक्षरशः गाजवला. या सिनेमात अभिनेता प्रभास हा प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत तर अभिनेत्री क्रिती सॅनॉन हि माता सीतेच्या भूमिकेत दिव्या स्वरूपात आपल्या भेटीस येत आहेत. हा सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी सर्वत्र थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून याबाबत निर्मात्यांनी एक मोठी घोषणा केली आहे. लोकांच्या श्रद्धांचा आदर करण्या हेतू प्रत्येक थिएटरमध्ये एक आसन (सीट) भगवान हनुमंताला समर्पित करण्यात येणार आहे.
अभिनेता प्रभासचा ‘आदिपुरुष’ हा सिनेमा २०२३ सालातील अत्यंत बहुप्रतीक्षित सिनेमा आहे. हा सिनेमा रिलीज होण्यासाठी अगदी २ आठवडे बाकी असताना सिनेमाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि सिनेमाची टीम पूर्ण ताकद लावत आहे. दरम्यान निर्मात्यांनी प्रमोशनच्या अंतिम टप्प्याला सुरुवात केली असताना सिनेमाच्या रिलीज संदर्भात एक सीट न विकण्याची घोषणा केली आहे. निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘जिथे रामायणाचे पठण केले जाते तेथे देव हनुमंत दिसतात. ही आमची श्रद्धा आहे आणि या श्रद्धेचा आदर करून आदिपुरुष सिनेमाच्या स्क्रीनिंग दरम्यान प्रत्येक थिएटरमध्ये देव हनुमंतासाठी एक जागा राखीव ठेऊन त्यांना समर्पित केली जाईल. हि आमची त्यांना आदरांजली असेल’.
Team #Adipurush to dedicate one seat in every theater for Lord Hanuman 🚩🙏🏻
Jai Shri Ram 🙏 #Adipurush in cinemas worldwide on 16th June! ✨ #AdipurushTrailer2 #AdipurushOnJune16th#AdipurushActionTrailer#AdipurushIn3D #Prabhas #SaifAliKhan #KritiSanon #SunnySingh #OmRaut pic.twitter.com/UcP7Aafks8
— Movies wallah (@Movies_Wallah) June 6, 2023
‘आदिपुरुष’ सिनेमाच्या स्क्रिनिंग दरम्यान प्रत्येक थिएटरमधील ही एक सीट राखीव असेल आणि हि न विकलेली सीट हनुमंताला समर्पित केलेली असेल. निर्मात्यांनी केलेल्या या घोषणेने प्रेक्षकांनाही प्रभावित केले आहे. आता या सिनेमाच्या स्क्रीनिंगबाबत प्रेक्षकांमध्ये जास्तच उत्सुकता पहायला मिळते आहे. ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. मुख्य म्हणजे हा सिनेमा तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नड अशा एकूण ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हा सिनेमा भारतीय महाकाव्य रामायणावर आधारित असा अध्यात्मिक अन पौराणिक सिनेमा आहे. याचे लेखन आणि दिग्दर्शन ओम राऊतने केले असून यामध्ये प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान, सनी सिंग, देवदत्त नागे यांसारखी तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. मुख्य भूमिकेत आहेत, तर आणि देवदत्त नागे सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत.
Discussion about this post