हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही आठवड्यांपासून ‘द केरला स्टोरी’ या सिनेमावरुन सुरु झालेला वाद आज थांबेल, उद्या थांबेल म्हणता म्हणता थांबायचं काही नाव घेईन. धर्मांतर अन लव जिहाद सारख्या ज्वलंत विषयांवर परखड भाष्य करत या सिनेमाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. वादात अडकूनही या सिनेमाने २०० कोटींची कमाई केली. यानंतर आता ‘अजमेर ९२’ हा सिनेमा नव्या वादाला तोंड फोडणार असे दिसून येत आहे. नुकताच या सिनेमाचा टिझर आणि पोस्टर रिलीज झाले असून सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.
‘अजमेर ९२’ हा सिनेमा तीस वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेशी संबंधित सत्य घटनेवर आधारित आहे. पोस्टरमध्ये एका वृत्तपत्रातील कात्रणे आहेत. ज्यामध्ये ‘एकामागून एक आत्महत्येचा पडदा’, २५० महाविद्यालयीन तरुणी बळी ठरल्या, ‘आत्महत्या नव्हे ही तर हत्या’ अशा हेडलाईन्स दिसत आहेत. माहितीनुसार, ‘१९९२ मध्ये अजमेरमध्ये एक अशी घटना घडली होती जिने सर्वांचे हृदय पिळवटून टाकले होते. शाळा- कॉलेजमधील १८ ते १९ वर्षांच्या जवळपास ३०० मुलींना त्यांचे न्यूड फोटो दाखवून ब्लॅकमेल करण्यात आले होते. तर १०० हून अधिक मुलींवर बलात्कार करण्यात आले होते’. याच घटनेवर आधारलेले या सिनेमाचे कथानक आहे. मात्र निर्मात्याने इथे केवळ २५० मुलींचा उल्लेख केला आहे. ही घटना घडवून आणणाऱ्या एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली होती.
‘अजमेर ९२’ हा सिनेमा येत्या जुलै महिन्यात प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जात आहे. अल्पसंख्याक समुहावर भाष्य करणारा जा सिनेमा प्रदर्शित होऊ नये आणि त्यावर बंदी घातली जावी यासाठी जमीयत उलमा ए हिंदने निदर्शने अन मोर्चा काढला आहे. जमीयतचे अध्यक्ष मौलाना महमूद मदनी यांनी म्हटले आहे कि, ‘अजमेर शरीफच्या दर्गाहला बदनाम करण्याचा कट यानिमित्तानं केला जातोय. या चित्रपटाच्या माध्यमातून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. दोन समुहात सलोखा जोडण्याऐवजी त्यात वाद कसा होईल असे दिसते आहे. त्यामुळे आम्ही या चित्रपटाला विरोध करत आहोत अन तो प्रदर्शित केला जाऊ नये, अशी आमची मागणी आहे’. पुष्पेंद्र सिंह दिग्दर्शित या सिनेमात सयाजी शिंदे, मनोज जोशी, राजेश शर्मा आणि जरीना वहाब हे कलाकार महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा येत्या १४ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होईल असे सांगितले जात आहे.
Discussion about this post