हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे नेहमीच काही ना काही वेगळं आणि हटके पद्धतीचं मनोरंजन प्रेक्षकांना देऊ पाहत असतात. गेल्या वर्षी असाच एका वेगळ्या कलाकृतीने महाराष्ट्र गाजवला होता. दिग्दर्शक तृशांत इंगळेचा ‘झॉलीवूड’ हा चित्रपट महराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. या चित्रपटातून झाडीपट्टी रंगभूमीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन, तांत्रिक बाजू, अभिनय अशा अनेक कारणांमुळे या चित्रपटाला चित्रपट क्षेत्रातील दिग्गजांची कौतुकाची थाप मिळवली होती.
‘झॉलीवूड’ या चित्रपटाने देश विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवातसुद्धा उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. चित्रपट क्षेत्रातील मानाचा समजला जाणारा पदार्पणातील उत्कृष्ट दिग्दर्शनाचा फिल्म फेअर पुरस्कार ‘झॉलीवूड’ चित्रपटासाठी तृषांत इंगळेंला मिळाला आणि पुन्हा एकदा चित्रपटाची गुणवत्ता सिद्ध झाली. गेल्या वर्षी ५ जून २०२२ रोजी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या ‘झॉलीवुड’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. याच विशेष दिवसानिमित्त दिग्दर्शक तृषांत इंगळेंनी आपल्या दुसऱ्या चित्रपटाची घोषणा करत प्रेक्षकांना एका नव्या कलाकृतीचा संकेत दिला आहे.
या आगामी चित्रपटाचे नाव ‘उलगुलान’ असे आहे. या शीर्षकावरून चित्रपटाचे कथानक काय असेल..? कशावर आधारित किंवा कशाला अनुसरून असेल..? हे सांगणे कठीण आहे. म्हणूनच तृषांत इंगळे यांनी ‘उलगुलान’ चा अर्थ सांगितलं आहे. तृषांत इंगळे म्हणाले, ‘उलगुलान’चा अर्थ क्रांती असून हा चित्रपट भारतातल्या आदिवासी समाजावर भाष्य करणारा आहे. या चित्रपटातून महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते आपल्या भेटीस येणार आहेत. नागपूर विदर्भातीलसुद्धा कलावंत यामध्ये नक्कीच झळकतील. चित्रपटाचे लेखन पटकथा लेखन पूर्ण झाले असून निर्मितीसाठी ऑगस्टपासून सज्ज होणार आहे’.
Discussion about this post