हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय कॉमिक शो आहे. या कार्यक्रमाचा भाला मोठा प्रेक्षक वर्ग आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मातब्बर कलाकारांनी अगदी कोरोना काळातही प्रेक्षकांना भरभरून हसवले आहे. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग असलेले समीर चौगुले तर प्रेक्षकांची जान आहेत. केवळ अभिनेता म्हणून नव्हे तर लेखक म्हणूनही ते नेहमीच अव्वल ठरतात. शिवालीचे बाबा, चौगुले काका, लोचन मजनू हि त्यांनी गाजवलेली काही पात्रे आहेत. ते कायमच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर जादू करतात आणि म्हणूनचत्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. चौगुलेंच्या स्किटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात आणि अशाच एका स्कीटमुळे त्यांना माफी मागावी लागली आहे.
त्याच झालं असं कि, समीर चौगुले यांनी हास्यजत्रेत काही स्किट सादर करताना विनोद निर्मितीसाठी ‘तारपा नृत्य’ विचित्र पद्धतीने सादर केले आहे. ‘तारपा’ हा आदिवासी समाजाचा पारंपरिक लोकनृत्य प्रकार आहे आणि त्याची अशी अवहेलना आदिवासी समाजाला मान्य नाही. त्यामुळे त्यांनी समीर चौगुलेंची भेट घेऊन या प्रकारावर आक्षेप घेत त्यांना माफी मागायला लावली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत समीर चौगुले तारपा नृत्य करताना दिसत आहेत. त्यानंतर आदिवासी समाजातील काही कार्यकर्ते म्हणताना दिसतात कि, ‘आम्ही या प्रकाराचा निषेध करत आहोत. समीर चौगुले आणि त्यानंतर कुणीही या नृत्य प्रकारचा अवमान करणार नाही अशी खबरदारी आम्ही घेऊ’. पुढे समीर चौघुले माफी मागताना दिसत आहेत.
अभिनेते समोर चौगुले यांच्या माफीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये समीर चौगुले माफी मागत म्हणतात कि, ‘सध्या माझ्या एका प्रहसनाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये मी तारपा नृत्य करतो असं सांगितलं होतं, पण तसं मी केलं नाही. जे स्किट मी सादर केलं त्यातून आदिवासी समाजाच्या भावना अनावधानाने दुखावल्या गेल्या. त्याबद्दल मी सर्व आदिवासी बंधु भगिनींची माफी मागतो. झालेल्या प्रकाराबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, आणि असं पुन्हा कधीच होणार नाही याची ग्वाही देतो. हा प्रकार अनावधानाने झाला आहे. या स्किटमधून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतु नव्हता आणि कधीच नसतो. मी पुन्हा एकदा सर्वांची माफी मागतो’. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले आहे कि, ‘आता समजली असेल आदिवासींची पावर’.
Discussion about this post