हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ हि मालिका नेमकी कोणत्या वळणावर चालली आहे हे समजायला काही मार्ग नाही. काही भागांपुर्वी मालिकेत अरुंधतीच्या दुसरा नवऱ्याची अर्थात आशुतोषची बहीण वीणाची एंट्री झाली आहे. मुख्य म्हणजे हि वीणा येतानाच अनिरुद्धची बिजनेस पार्टनर होऊन आल्याने इथेच गणित बिघडलं. वीणाचा अनिरुद्धंवर असलेला विश्वास अरुंधती आणि आशुतोषच्या नात्यावर भारी पडणार का काय असे काहीसे गेल्या काही दिवसात दिसू लागले आहे. वीणाला हाताशी धरून अनिरुद्ध बरोबर त्याची खेळी खेळतोय आणि अरुंधतीला मनस्ताप देतोय.
अनिरुद्धने आशुतोष आणि वीणामध्ये फुट पाडायला सुरुवात केली असून त्याने कट कारस्थान करून वीणाच्या कंपनीतून आशुतोषचा वाटा काढून टाकला आहे. यानंतर आता तो वीणाला अरुंधतीच्या विरोधात भडकवताना दिसतो आहे. सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये वीणा अरुंधतीच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करताना दिसते. या प्रोमोमध्ये अरुंधती छानपैकी नटून थटून वट पौर्णिमेच्या सणाला निघालेली दिसते. यावेळी अनिरुद्धच्या आईने म्हणजेच कांचन ताईंनी तिला पूजेसाठी आमंत्रण दिले आहे. यावेळी वीणा अनिरुद्धची बाजू घेत अरुंधतीला टोचेल असं बोलते.
प्रोमो व्हिडिओमध्ये, ‘अरुंधती वट पौणिमेच्या पूजेसाठी निघते तेव्हा तिची सासू म्हणजे आशुतोषची आई म्हणते तू जा तिथे पूजा करायला.. माझं कांचन ताईंशी बोलणं झालं आहे. माझी काहीच हरकत नाही. त्यानंतर अरुंधती पूजा करायला निघणार इतक्यात वीणा तिला अडवते आणि म्हणते, ‘ही कोणती पद्धत. यांनी का जावं तिथे.. आपल्या नवऱ्यासाठीची पूजा करायला कुणी आपल्या पहिल्या नवऱ्याच्या घरी जातं का..?? आणि मग अनिरुद्धचं काय..??’ वीणाचं असं बोलणं ऐकून अरुंधती आशुतोषच्याच घरी पूजा करते. आता पुढच्या भागात वीणा आणखी किती डोईजड होणार हे पहायला मिळेल.
Discussion about this post