Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हॉटेलच्या खोलीत जाऊन तुम्ही..’; ओम आणि क्रितीचा मंदिर परिसरातील किसिंग व्हिडीओ पाहून पुजारी संतापले

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 8, 2023
in Trending, गरम मसाला, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
0
SHARES
1k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘आदिपुरुष’ सिनेमा येत्या १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होतो आहे. सध्या या सिनेमाची संपूर्ण टीम प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. नुकताच दक्षिणेतील तिरुपती येथे या सिनेमाचा प्री रिलीज इव्हेन्ट पार पडला. या निमित्त सिनेमाची संपूर्ण टीम तिरुपतीमध्ये दाखल झाली होती. यावेळी सिनेमाची टीम तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी गेली होती. येथील ओम राऊत आणि क्रिती सॅनॉन यांच्या गुड बाय किसचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमुळे नेटकरी संतापले आहेतच. शिवाय मंदिरातील पुजाऱ्यांनी देखील आपला संताप व्यक्त केला आहे.

#Adipurush: Controversies continue to haunt the Team! While such a send-off gesture is quite common amongst the celebrities, it was inappropriate at the Tirumala. #KrithiSanon #OmRaut pic.twitter.com/hkUd2ButLG

— AndhraBoxOffice.Com (@AndhraBoxOffice) June 7, 2023

तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर मंदिर परिसरात एकमेकांचा निरोप घेताना दिग्दर्शक ओम राऊतने क्रिती सॅनॉनला गालावर किस केले. या गुड बाय किसचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होतो आहे. मंदिराच्या परिसरात असे वर्तन केल्याने ओम राऊत आणि क्रिती सॅनॉन दोघेही प्रचंड ट्रोल होत आहेत. आंध्र प्रदेशातील भाजप नेते रमेश नायडू नागोथू यांनीदेखील हा व्हिडीओ पाहताच आक्षेप नोंदवला आहे. मात्र त्यांनी ट्विट शेअर करून काही तासांनी डिलीट केले आहे. यानंतर आता तेलंगणातील चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजाऱ्यांनीही या घटनेला निंदनीय म्हणत संताप व्यक्त केला आहे.

Chilkur Balaji Temple Chief Priest Objected #Adipurush Actress #KritiSanon and director #OmRaut Behaviour at Tirumala this morning

He also added that Kriti is not fit for playing Sitamma character in the Film pic.twitter.com/GpmJo3X19H

— Daily Culture (@DailyCultureYT) June 7, 2023

चिलकुर बालाजी मंदिरातील मुख्य पुजारी या प्रकारावर म्हणाले कि, ‘हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. पती- पत्नीसुद्धा तिथे (मंदिरात) एकत्र जात नाहीत. तुम्ही हॉटेलच्या खोलीत जाऊन हवं ते करू शकता. मंदिराच्या परिसरात असे वर्तन करणे म्हणजे रामायण आणि देवी सीतेचा अपमान करण्यासारखे आहे’.

तसेच भाजपा नेते रमेश नायडू नागोथू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते कि, ‘इतक्या पवित्र ठिकाणी असे वर्तन कितपत योग्य आहे..? वेंकटेश्वर स्वामी मंदिरात अशाप्रकारे मिठी मारणे आणि किस करणे हे अपमानास्पद आणि अस्वीकार्य आहे’. अद्याप या संपूर्ण प्रकरणावर दिग्दर्शक ओम राऊत आणि क्रिती सॅनॉन यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मात्र ट्रोलिंगचा जोर वाढताना दिसत आहे.

Tags: AdipurushKriti sanonOm RautSocial Media TrollingTweeter PostViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group