Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘जॉली LLB 3’मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी एकत्र दिसणार; केव्हा रिलीज होणार..? जाणून घ्या

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 9, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Jolly LLB 3
0
SHARES
62
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीचा ‘जॉली एलएलबी’ हा सिनेमा तुफान गाजला होता. मुन्नाभाई एमबीबीएस, इश्किया यांपेक्षा जास्त प्रेम जॉलीमूळे अर्शदला मिळालं. प्रेक्षकांनी त्याच्या या सिनेमाला डोक्यावर उचलून घेतलं होत. ‘जॉली एलएलबी २’मध्ये मात्र अभिनेता अक्षय कुमार दिसला. याही सिनेमाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

पण अर्शद वारसीची कमी राहून राहून जाणवत होती. हि कमी आता ‘जॉली एलएलबी ३’मध्ये भासणार नाही याची मेकर्सने पूर्ण काळजी घेण्याचे ठरवले आहे. कारण ‘जॉली एलएलबी ३’मध्ये अर्शद वारसी आणि अक्षय कुमार हे दोन्ही तगडे कलाकार एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Arshad Warsi (@arshad_warsi)

अर्शद वारसी हा काय क्षमतेचा कलाकार आहे हे त्याने केलेल्या प्रत्येक सिनेमातून आपण पहिले आहे. तर अक्षय कुमारदेखील लोकप्रिय अभिनेता आहे. त्यामुळे दोघांची जोडी ‘जॉली एलएलबी ३’साठी परफेक्ट असल्याचे मेकरचे म्हणणे आहे. यामुळे ‘जॉनी एलएलबी ३’ हा सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. येत्या काही दिवसांत हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही बोलले जात आहे. यापूर्वीच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळल्यानंतर तिसरा भाग आणखी हटके असायला हवा यात काही शंका नाही.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमार, सौरभ शुक्ला आणि अर्शद वारसी सारख्या कलाकारांनी या चित्रपटामध्ये काम केले असले तरी अर्शदने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. त्याने रंगवलेला वकिल जॉली प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसला. म्हणूनच तिसऱ्या भागात अक्षय कुमारसोबत अर्शद वारसी असायला हवा असे प्रेक्षकांचे म्हणणे होते. तर मेकर्सनेही तसाच निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

याबाबत स्वतः अर्शद वारसीने माहिती देताना म्हटले कि, ‘मी अक्षय सोबत जॉली एलएलबीच्या तिसऱ्या भागात काम करणार आहे आणि याचे शुटींग लवकरच सुरु होईल’. अद्याप रिलीजबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. तसेच यावर अक्षय कुमारनेदेखील काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Tags: akshay kumarArshad WarsiBollywood Upcoming MovieInstagram PostJolly LLB 3
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group