Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

चांगभलं!! MHJ फेम शिवाली परबची ‘उलगुलान’मध्ये वर्णी; Insta’वर शेअर केलं सिनेमाचं पोस्टर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 10, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shivali Parab
0
SHARES
69
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अनेक विनोदवीर आणि हरहुन्नरी कलाकार मराठी मनोरंजन विश्वाला मिळाले आहेत. या कार्यक्रमाचा एक अविभाज्य भाग म्हणजे अभिनेत्री शिवाली परब. विविध कॉमिक पात्र साकारत शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रामधून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. विनोदाचं अचूक टायमिंग साधणारी शिवाली तिच्या अभिनयाच्या जोरावर अल्पावधीतच लोकप्रिय ठरली आणि आता तर मराठी चित्रपटांतही तिची वर्णी लागते आहे. नुकतंच तिच्या आगामी चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना हि आनंदाची बातमी दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

अभिनेत्री शिवाली परब आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. नुकतंच शिवालीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर तिच्या आगामी नव्या मराठी चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. तिच्या या आगामी चित्रपटाचं नाव ‘उलगुलान’ असे आहे. ‘झाडीपट्टी’ या चित्रपटानंतर तृशांत इंगळे ‘उलगुलान’ हा नवा चित्रपट आणि नवा विषय हाताळण्यास सज्ज झाले आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन तृशांत इंगळेने केले असून हा चित्रपट येत्या वर्षात अर्थात २०२४ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram

A post shared by Shivali Parab (@parabshivali)

शिवालीने आपल्या आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘ ”U L G U L A N” (The true story of a real fake) “उलगुलान”च्या नावानं चांगभलं. २०२४ ला थिएटरमध्ये .. नवा प्रोजेक्ट’. शिवलीच्या या पोस्टवर तिचे चाहते, नेटकरी तसेच मनोरंजन विश्वात कार्यरत असलेले कलाकार कमेंट करत तिला शुभेच्छा देत आहेत. याआधी शिवालीने ‘प्रेम प्रथा धुमशान’ या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटातील तिच्या मुख्य भूमिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली होती. तर या चित्रपटातील तिच्या किसिंग सीनने सोशल मीडिया गाजवला होता.

Tags: Instagram PostMarathi ActressMarathi upcoming movieMHJ FameShivali ParabViral Poster
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group