हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी गेली अनेक वर्ष मनोरंजन विश्व गाजवलं आहे. मालिका, सिरीज, चित्रपटांमधून त्यांनी नेहमीच विविध भूमिकांमधून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. निवेदिता सराफ या सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतात. त्यामुळे केवळ व्यावसायिक नव्हे तर कौटुंबिक अनुभवदेखील त्या शेअर करतात. यावेळी मात्र त्यांनी एक धक्कादायक अनुभव शेअर करत नाराजी व्यक्त केली आहे. मालाडच्या एका मॉलमध्ये त्या शॉपिंगला गेल्या असता त्यांना अतिशय चुकीची वागणूक मिळाल्याचे त्यांनी यात सांगितले आहे.
निवेदिता यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हि पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी लिहिलंय कि, ‘नमस्कार मी इन्फिनिटी २ मालाडमधील MAX दुकानात होते. मला खूप वाईट अनुभव आला. तिथे असलेला कर्मचारी त्यांना तुम्ही काहीही वस्तू विकत घ्या त्याची काही पर्वा केली नसते. साधी मदत करायला कोणीही तयार नव्हते. एक मुलगी बाहेर आली आणि तिने फक्त दुसर्या सेल्समनला सांगितले की तिच्याकडे वेळ नाही. जेव्हा एका व्यक्तीने मला ओळखले तेव्हा माफी मागायला सुरुवात केली आणि मॅनेजरला फोन केला. मला चांगली ट्रीटमेंट नको होती कारण मी एक ओळखीचा चेहरा आहे. मला चांगली ट्रीटमेंट हवी आहे कारण एक सामान्य ग्राहक म्हणून माझा तो हक्क आहे आणि त्या दुकानात पाऊल टाकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देखील समोरच्याकडून चांगली वागणून घेण्याचा हक्क आहे’.
निवेदिता सराफ यांनी शेअर केलेली हि पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आली आहे. यावेळी त्यांच्या अनेक चाहत्यांनी तसेच नेटकऱ्यांनी या पोस्टवर विविध कमेंट केल्या आहेत. अनेकांनी मॉलमध्ये मिळणाऱ्या वागणुकीबद्दल संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी मॅक्स ब्रँडबाबतही नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या त्या कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळत आहे.
Discussion about this post