Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘वड्याचं तेल वांग्यावर’; WTC फायनलमधील भारताच्या पराभवाचं खापर फुटलं अनुष्काच्या माथी

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, सेलेब्रिटी
Anushka Trolled
0
SHARES
79
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेविश्वाची लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्मा हि भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची पत्नी आहे हे आपण सारेच जाणतो. दोघेही सेलिब्रिटी आणि दोघांचाही मोठा चाहता वर्ग आहे. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर काही ना काही कारणांमुळे हे दोघे ट्रोल असतात. अशातच WTC ची फायनल पाहण्यासाठी अनुष्का गेली असता ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पराभव झाला, हे काही लोकांच्या पचनी पडलेले नाही. त्यामुळे या पराभवाचा राग लोकांनी अनुष्काला ट्रोल करत काढला आहे.

India win % is 0 when Anushka Sharma present in the stadium in ICC tournaments. pic.twitter.com/kI0m0JpGiG

— Johns. (@joh_n_s_) June 11, 2023

भारताचा क्रिकेट मॅचमध्ये पराभव झाला कि तो लोकांच्या जिव्हारी लागतोच. पण यावेळी लोकांना राग काढायला आयती अनुष्का सापडली आहे. तसं तर ‘भारत परदेशात गेला की खेळत नाही’ असेही काहींनी मत व्यक्त केले आहे. मात्र अनेकांनी या पराभवाला अनुष्काचं जबाबदार असल्याचे म्हटले आहे. अनुष्काचा पती अर्थात भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली याला WTC च्या फायनलमध्ये अर्धशतक करण्याची संधी होती. पण तो ४९ धावांवर बाद झाला. अखेरीस भारताचा मोठ्या धावसंख्येनं पराभव झाला. यानंतर सोशल मीडियावर भारतीय क्रिकेट संघाला वाट्टेल ते बोलले गेले. काहींनी असेही म्हटले कि, IPLमध्ये पैसा कमविण्याची संधी असते म्हणून मुख्य मॅच भारतीय संघ नीट खेळत नाही’.

People trolling Anushka Sharma for India’s loss I am already loving it.

— IshitaTiwari (@Tiwariishitaa) June 11, 2023

हे कमीच म्हणून विराट कोहलीची पत्नी अर्थात अभिनेत्री अनुष्का शर्मालाही नेटकऱ्यांनी ट्रोल केले. ‘तू फायनलमध्ये आलीसचं का..? तू आलीस आणि इंडिया हरली’, ‘तू आली की भारत हरतोच..’, ”पक्की पनौती आहे.. मॅचला आली की INDIA हरतेच’; ‘हि मॅचला होती म्हणूनचं हरलो आपण’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांनी अनुष्काला ट्रोल केले आहे. मुळात विराट जेव्हा आऊट झाला तेव्हा अनुष्काला मोठा धक्का बसला होता.

Anushka Sharma knows this very well that her presence is bad luck for Team India, but still she comes to stadium so that India doesn’t win any match or ICC Trophy under Rohit’s captaincy !!

— Aaditya 🇮🇳 (@i_adityaawasthi) June 11, 2023

यावेळी तिची जी प्रतिक्रिया होती त्याचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे तिचा चाहता वर्ग तिला ट्रोल करणाऱ्यांना सुनावताना दिसतो आहे. ‘दरवेळी इंडिया हरली म्हणून तिला बोलायची गरज नाही’, ‘तिचा पराभवाशी काहीच संबंध नाही’, ‘तिला असं बोलणं चुकीचं आहे’ अशा शब्दांत काहींनी अनुष्काची पाठराखण केली आहे.

Tags: anushka sharmaBollywood ActressSocial Media Trollingviral tweetVirat Kohli
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group