हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आपल्या ग्लॅमरस लूक आणि बोल्ड अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असणारी अभिनेत्री अनुषा दांडेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. यामुळे सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिचे फोटो आणि तिची अदा हि नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित करत असते. शिवाय चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती स्वतः देखील विविध लूक शेअर करताना दिसते. नुकतीच तिने एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि वेदनादायी अनुभव शेअर केला आहे. हि पोस्ट पाहून अनुषाचे चाहते तिच्याबाबतीत चिंता व्यक्त करत आहेत.
अनुषा दांडेकरने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामच्या माध्यमातून हि पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाल्याचे सांगिले आहे. हा अनुभव किती वेदनादायी आहे हे सांगत तिने सर्व मुलींना आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. विना मेकअप फोटो शेअर करत अनुषाने लिहिले आहे कि, ‘मी फक्त तुम्हाला सगळ्यांना हॅलो म्हणायला आले आहे. अलीकडेच, माझ्या गर्भाशयाच्या गाठीची शस्त्रक्रिया झाली आहे. ती गाठ बऱ्यापैकी गंभीर होती. मी भाग्यवान आहे की सर्व काही व्यवस्थित पार पडलं. ही प्रक्रिया चालू असताना, आणखी अनेक गाठी सापडल्या, त्या सर्व डॉक्टरांनी काढल्या आहेत’.
पुढे म्हणाली कि, ‘मला पूर्ण बरं होण्यासाठी अजून थोडे दिवस लागतील पण आता सगळं ठीक आहे’. यानंतर अनुषा दांडेकरने सर्व मुलींना महत्त्वाचा सल्ला देत म्हटले आहे कि, ‘मला सर्व मुलींना सांगायचं आहे की तुम्ही नियमित गायनॅकॉलॉजिस्टचा सल्ला घ्या. दरवर्षी न चुकता तुम्ही गायनॅकॉलॉजिस्टकडून तपासणी करून घ्या. जेणेकरून तुम्ही तुमच्या आरोग्याकडे आणि सुरक्षिततेकडे लक्ष दिलं जाईल. मी १७ वर्षांची असल्यापासून हे करत आहे’. या पोस्टमध्ये तिने डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. या पोस्टवर अनुषाचे चाहते, नेटकरी आणि सिनेविश्वातील अनेक कलाकार तिच्या प्रकृतीविषयी विचारपूस करत आहेत.
Discussion about this post