Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

राज- कावेरीची साथ मृत्यूने तुटणार..?; ‘भाग्य दिले तू मला’ मालिका धक्कादायक वळणावर

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 14, 2023
in फोटो गॅलरी, Hot News, Trending, TV Show, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Bhagya dile tu mala
0
SHARES
159
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठी वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ हि मालिका प्रेक्षकांच्या दैनंदिन आयुष्याचा भाग झाली आहे. या मालिकेत मुख्य भूमिकेत असणारे राज आणि कावेरी हे तर प्रेक्षकांच्या घरातील सदस्यांप्रमाणे झाले आहेत. त्यांच्या आयुष्यातील सुखाचा आणि दुःखाचा प्रेक्षकांवरही परिणाम होत असतो. या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसत आहेत. अशातच मालिकेच्या एका प्रोमोमुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रोमोवर येत्या भागात कावेरीचा जीव धोक्यात येणार आहे आणि यामुळे कदाचित नायक- नायिका दुरावणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Vivek Ramesh Sangle (@viveksangle06)

अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले हे कलाकार राज अन कावेरीची भूमिका साकारत आहेत. त्यांच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. मालिकेत त्यांच्या लग्नानंतर मोठमोठे ट्विस्ट दाखवले गेले. मध्यंतरी रत्नमाला मोहिते म्हणजेच राजवर्धनच्या आईची सगळी प्रॉपर्टी वैदेही आणि सानियाने हस्तगत केल्यामुळे त्यांचा ‘माहेरचा चहा’ या कंपनीगळती, त्यांनी खाल्लेल्या खचता आणि नव्याने सुरुवात असे कथानक रंजक पद्दतीने मांडण्यात आले. या सर्व संकटांवर मात केल्यानंतर राजच्या आईने एक नवी सुरुवात म्हणून राज-कावेरीला हनिमूनला पाठवले असता नियतीला त्यांचे सुख मान्य नाही असेच दिसत आहे.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

सानियाने राज आणि कावेरीच्या घातपाताचा कट रचला असून येत्या भागात ते हनिमूनला गेले असताना एक अज्ञात व्यक्ती बाईकवरून येताना दिसतो. कावेरी फोटोसाठी पोज देत असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून तो तिला धक्का मारून दरीत ढकलतो, असे व्हायरल प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकांना मोठा धक्का लागला आहे आणि त्यांनी या ट्विस्टबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका युजरने म्हटले आहे कि, ‘ही सीरिअल आवडत्या सीरिअल पैकी एक होती. आता काय बावळटसारख दाखवताय. आम्ही आनंदी मालिका बघू शकतो अस भयंकर दुःख कष्ट दाखवायची काही गरज नाही’. आणखी एकाने म्हटले, ‘असे दाखवायला नको होते, जर दाखवायचेच असेल तर कावेरीला परत जिवंत दाखवा नाही तर मालिका बघणार नाही’. आता मालिकेचे कथानक पुढे कसे सरकते हे पाहण्यासाठी प्रेक्षकही आतुर झाले आहे.

Tags: Bhagya Dile Tu malaInstagram PostNew Twisttv serialViral PromoViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group