Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘राजा माणूस..’; मराठी कलाकारांनी राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शेअर केल्या खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 14, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, महाराष्ट्र, सेलेब्रिटी
Raj Thackeray Birthday
0
SHARES
114
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १४ जून आणि आज राजकीय क्षेत्रातील एकमेव व्यक्ती जिच्या भाषणासाठी जनसमुदायाची भली मोठी गर्दी लोटते त्या राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. राज ठाकरे स्वतः कलाप्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि मनोरंजन विश्वातील मराठी कलाकारांच्या ते सदैव पाठीशी उभे राहताना दिसले आहेत. त्यामुळे कलाकारांनाही त्यांच्याविषयी विशेष प्रेम आणि आदर वाटतो. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी आजच्या खास दिवशी काही कलाकारांनी खास पोस्ट शेअर केल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या मैत्रीबद्दल तर आपण सारेच जाणतो. तर आज राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त केदार शिंदे यांनीही एक खास पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी राज ठाकरेंसोबतचा एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘राजा माणूस… वाढदिवस शुभेच्छा’.

View this post on Instagram

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

याशिवाय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना लिहिले आहे कि, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष, मा. श्री. राजसाहेबांना वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा..इथून पुढील सर्वच वर्ष, खासकरून हे वर्ष आपल्या आयूष्यातील सर्वोत्कृष्ट वर्ष ठरो…शुभेच्छा’

View this post on Instagram

A post shared by Siddharth jadhav (@siddharth23oct)

मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधवनेदेखील राज ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्राम हॅण्डलच्या स्टोरीवर शेअर केला आहे. सोबत त्याने लिहिले आहे कि, ‘मा.राजसाहेब ठाकरे… वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा….’

तसेच अभिनेता रितेश देशमुखनेसुद्धा राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासोबतचा एक फोटो इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिले आहे की, ‘मराठी हृदयावर राज करणारे एक उत्कृष्ट वक्ते महाराष्ट्राचे नेते व माझे मित्र श्री राज श्रीकांत ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा’

याशिवाय महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता पृथ्वीक प्रतापने राज ठाकरेंबरोबरचा एक फोटो अधिकृत इंस्टाग्राम हँडलच्या स्टोरीवर शेअर केला आहे. हा फोटो राज ठाकरेंना टॅग करत त्याने ‘हॅपी बर्थडे’ लिहिले आहे.

Tags: Birthday PostInstagram PostInstagram StoryMarathi CelebritiesRaj Thackrey
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group